Viral Video Saam Tv
देश विदेश

Video: 14 सिंहिणीशी एकटाच लढला छोटा हत्ती, व्हिडिओ व्हायरल

2 मिनिटे 20 सेकंदाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वृत्तसंस्था

Trending Elephant & Lions Fight Video: तुम्ही एक म्हण ऐकली असेल "जाको राखे साइयां मार सके ना कोई" ज्याचा अर्थ असा आहे की ज्याच्यावर देवाची कृपा आहे त्याला कोणीही काही करू शकत नाही. हे इथे सांगणे योग्य आहे कारण एका छोट्या हत्तीवर 14 सिंहिणांनी हल्ला केला आहे. यावेळी या छोट्या हत्तीने न घाबरता शांत राहून, संयमाने संकटावर मात केली.

भारतीय वन सेवेचे अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. 2 मिनिटे 20 सेकंदाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एका छोट्या हत्तील14 सिंहीणांचा सामना करताना दाखवले आहे. यादरम्यान एक सिंहीण हत्तीच्या पाठीवर चढते आणि दुसरी मागून हल्ला करते. तरीही हा हत्ती या सिंहीणांचा कठोरपणे सामना करतो आणि त्यांना खाली फेकतो.

बाकी सिंहीणही देखील हत्तीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. पण हा हत्ती कोणतीही चूक न करता लढत राहतो आणि त्यांचा पराभव करतो. त्यानंतर तो पाण्याच्या दिशेने धावतो पण सिंहिणी त्याला सोडत नाही. हत्ती तिथून पाण्याच्या दुसऱ्या बाजूला जायला लागतो आणि सिंहिणी त्याच्याकडे पाहतच राहते.

हा व्हिडीओ 2014 चा आहे जो त्याच्या कंटेंटमुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आयएफएस अधिकारी सुसंता नंदा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हत्तीच्या बळामुळे सिंहीण अपयशी ठरल्याचं एका युझरने म्हटलं आहे. त्याचबरोबर आणखी एका युझरने लिहिले की, जंगलात काय होऊ शकतं हे सांगता येत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: मित्र ठरले वैरी! व्यावसायिकाच्या डोक्यात झाडली गोळी; गोळीबाराच्या घटनेनं पिंपरी चिंचवड हादरलं

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या eKYC साठी मुदतवाढ मिळणार का? महत्वाची माहिती समोर

MCA Election: मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणूक; अजिंक्य नाईक गटाला 12 जागा, आशिष शेलारांना धक्का, उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड

MP Shrikant Shinde : मुंब्र्यात दहशतवादी पथकाकडून सर्च ऑपरेशन करण्याची गरज; खासदार श्रीकांत शिंदे असे का म्हणाले?

Ind vs SA 2nd Test: भारतविरुद्ध दक्षिण अफ्रिकेच्या दुसऱ्या कसोटीच्या वेळेत बदल, कधी सुरु होणार सामना? का होणार बदल जाणून घ्या

SCROLL FOR NEXT