Ludo खेळताना जडलं प्रेम, मग लग्नासाठी हजारो किमीचा प्रवास; पण गेम फिरला अन्.. Saam Tv
देश विदेश

Ludo खेळताना जडलं प्रेम, मग लग्नासाठी हजारो किमीचा प्रवास; पण गेम फिरला अन्..

ऑनलाईन लुडो गेम खेळताना एकमेकांच्या प्रेमात पडले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : एकदा प्रेमात पडल्यावर व्यक्तीला काय चूक आणि काय बरोबर हे समजत नसल्याचे खूप वेळेस सांगितले जाते. ही बाब सिद्ध करणारी काही उदाहरने देखील आपण पाहिलेली आहेत. पण हरियाणा येथील पानिपत शहरात अशीच एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पानिपत मधील भीमनगरमध्ये राहणारा एक मुलगा आणि ओडिशाच्या रुरकेला मध्ये राहणारी एक मुलगी ऑनलाईन लुडो गेम Online Game खेळताना एकमेकांच्या प्रेमात Love पडले आहेत.

मुलाबरोबर लग्न करण्याकरिता मुलीने तब्बल १ हजार ६५० किलोमीटरचा प्रवास करत त्याचे घर गाठले आहे. अल्पवयीन मुलाचे कुटुंबीय दोघांचे लग्न देखील लावणार होते. मात्र, जिल्हा महिला संरक्षण आणि बालविवाह प्रतिबंधक विभागाच्या सतर्कतेमुळे हे लग्न थांबवण्यात यश आले आहे. या प्रकरणात मुलगा मूळचा हा उत्तर प्रदेश मधील गोरखपूरचा रहिवासी आहे. २० वर्षांपासून त्याच कुटुंब पानिपत मध्ये वास्तव्याला आहे. तर, मुलीचे कुटुंब बिहारच्या बेगूसराय जिल्ह्यात राहत आहे. काही वर्षांअगोदर ते ओडिशा या ठिकाणी स्थलांतरित झाले होते.

हे देखील पहा-

त्याठिकाणी रुरकेला रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये ते वास्तव्याला आहेत. काही दिवसाअगोदर लुडो किंगवर Ludo King ऑनलाइन गेम खेळताना संबंधित मुलाची आणि मुलीची ओळख झाली होती. त्यानंतर दोघांनी फेसबुकवर गप्पा मारण्यास सुरुवात केली होती. कालांतराने मैत्रीच रुपांतर प्रेमात झाले आणि दोघांनीही लग्न करण्याचा उत्तम निर्णय घेतला होता. याबाबत मुलीने आपल्या घरी देखील कल्पना दिली होती.

मात्र, मुलीच्या कुटुंबियांनी आणखी १-२ वर्ष लग्न लावून देण्यास नकार दिला होता. परिणामी मुलगी २ ऑक्टोबर दिवशी घर सोडून थेट पानिपतला पोहोचली, अशी माहिती जिल्हा महिला संरक्षण आणि बालविवाह प्रतिबंधक अधिकारी रजनी गुप्ता यांनी दिली आहे. मुलीने आपल्या मोठ्या बहिणीला घर सोडण्यासाठी कल्पना देऊन काही पैसे घेऊन घर सोडले होते. रुरकेला ते पानीपत असे तब्बल १ हजार ६५० किमी अंतर कापून ती मुलाकडे परतली आहे.

मुलाने तिला आपल्या घरी नेले आहे. त्यानंतर मुलाच्या नातेवाईकांनी लग्नासंदर्भात मुलीच्या कुटुंबियांशी संपर्क साधून चर्चा देखील केली आहे. मात्र, त्यांनी पानिपतला येण्यास नकार दिला होता. यानंतर मात्र, मुलाच्या नातेवाईकांनी ४ ऑक्टोबर दिवशी दोघांचे लग्न लावण्याचा निर्णय घेतला होता. कुणीतरी या प्रकरणात मुलगा अल्पवयीन असल्याची माहिती चाइल्ड हेल्पलाइनला दिली होती.

त्यानंतर जिल्हा महिला संरक्षण आणि बालविवाह प्रतिबंधक विभागाने लग्नस्थळी धाव घेतली आहे. अधिक चौकशी केली असता, आधार कार्डवर जन्म तारखेनुसार मुलाचे वय २० वर्ष ८ महिने कायद्यानुसार मुलाच लग्नाचे योग्य वय २१ वर्ष निश्चित केले आहे. आणि मुलीचे वय १९ वर्ष असल्याचे लक्षात आले आहे. मुलगा अल्पवयीन असल्याचे समोर आल्यावर लग्न समारंभ थांबण्यात आला होता, असे देखील रजनी गुप्ता यांनी माहिती दिली आहे.

दरम्यान, जिल्हा महिला संरक्षण आणि बालविवाह प्रतिबंधक विभागाने मुलगा आणि मुलीच्या शैक्षणिक कागदपत्रांची मागणी करण्यात आली आहे. तोपर्यंत एक प्रतिज्ञापत्र घेऊन लग्न थांबवण्यात आले आहे. मुलाच्या नातेवाईकांनी २ ते ३ दिवसात वयाचा पुरावा देणारी आवश्यक ती कागदपत्रे कार्यालयात जमा करावेत. तोपर्यंत मुलीला मुलाच्याचं घरी ठेवण्याच्या, सूचना देखील दिले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT