उत्तर प्रदेशमध्ये भीषण रेल्वे अपघात
ट्रेनच्या धडकेत ५ जणांचा जागीच मृत्यू
पोलिस आणि जीआरपीकडून तपास सुरू
उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये भीषण रेल्वे अपघात झाला. ट्रेनच्या धडकेत ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. यमुनानगर झोनमधील करछना भागात बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून सर्व मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. या रेल्वे अपघाताचे कारण समोर आले नाही. रेल्वे प्रशासन अपघाताचे कारण शोधत आहे.
बुधवारी संध्याकाळी यमुनानगर झोनमधील करछना परिसरात हा भीषण रेल्वे अपघात झाला. ट्रेनच्या धडकेत ५ जण दूरवर फेकले गेले. या अपघातामध्ये पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांच्या मृतदेहांचे तुकडे झाले. हा अपघात प्रयागराज विभागाच्या रचना-भिरपूर मार्गावर घडला.
संध्याकाळी सव्वासहाच्या सुमारास याठिकाणावरून जाणाऱ्या १२३१२ क्रमांकाच्या ट्रेनच्या गार्ड आणि लोको पायलटला रुळावर एक मृतदेह पडल्याचे दिसले. त्यांनी तात्काळे रेल्वे पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच, ट्रेन तात्काळ थांबवण्यात आली आणि संबंधित अधिकाऱ्यांना कळवून आवश्यक कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली. दरम्यान, पावणे सातच्या सुमारास पुरुषोत्तम एक्स्प्रेस त्याच रुळावरून जात होती. या ट्रेनची धडक बसल्याने चार जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच जीआरपी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्व मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. सर्व मृत व्यक्ती फिरोजाबाद जिल्ह्यातील खैरगड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी होते आणि ते कोलकाताला जात होते. गिरिराज, आकाश, अजय आणि मुन्ना पासी या चौघांचा मृत्यू झाला. या अपघाताबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.