Scene from the tragic Bolero crash in Sambhal, UP, where 8 lives including the groom were lost as the vehicle rammed into a college wall. 
देश विदेश

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

TRAGIC ROAD ACCIDENT IN UP: उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात लग्नाला निघालेल्या बोलेरो गाडीचा भीषण अपघात झाला. जुनावई भागात भरधाव वेगात असलेली बोलेरो गाडी थेट जनता इंटर कॉलेजच्या भिंतीवर आदळली. या अपघातात नवरदेवासह आठ जणांचा मृत्यू झाला असून त्यात तीन लहान मुलांचाही समावेश आहे.

Namdeo Kumbhar

Groom dies in car crash while going to wedding in Uttar Pradesh : लग्न समारंभासारख्या आनंददायी प्रसंगावर दुखाचे सावट पसरल्याची धक्कादायक आणि दुर्दैवी घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. नवरदेवासह आठ जणांचा अपघातात मृत्यू झाला आहे. संभलमध्ये जुनावई येथे भरधाव वेगात असणारी बोलेरो गाडी जनता इंटर कॉलेजच्या भिंतीवर आदळली. या दुर्दैवी अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये तीन चिमुकल्यांचा समावेश आहे. या अपघाता पाच जण जखमी झाले आहेत, त्यांना उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले.

उत्तर प्रदेशातील संभलच्या जुनावई पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा भयंकर अपघात झाला. लग्नासाठी निघालेली बोलेरो गाडी कॉलेजच्या भिंतीवर जोरदारपणे आदळली. या गाडीत एकूण १४ जण होते. नवरदेवासह सर्वजण वधूला घ्यायला निघाले होते. गाडी भिंतीवर इतक्या जोरात आदळली की घटनास्थळीच नवरदेवासह पाच जणांचा मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी आरडाओरड अन् किंचाळ्यांचा आवज घुमला होता. स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. तात्काळ मदतकार्य करत अपघातामधील जखमींना रूग्णालयात दाखल केले. पण उपचारावेळी तीन जणांचा मृत्यू झाला. आणकी पाच जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलिसांकडून तपास सुरू

भीषण अपघाताची माहिती मिळताच संभल पोलीस घटनास्थळी पोहोचले. तातडीने गाडीतील जखमींना बाहेर काढून सरकारी रुग्णालयात दाखल केले. यापैकी पाच जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. जुनावई पोलिसांनी सांगितले की, प्रथमदर्शनी असे दिसते की हा अपघात अतिवेगामुळे झाला आहे. तरीही, पोलीस अपघाताच्या कारणांचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी सांगितले की, अपघात इतका भयंकर होता की बोलेरो गाडी भिंतीमध्ये अडकली होती. जेसीबीच्या साहाय्याने ती भिंतीतून बाहेर काढली गेली. जखमींना उपचारासाठी जुनावई सीएचसीमध्ये नेण्यात आले, जिथून पाच गंभीर जखमींना हायर सेंटरला पाठवण्यात आले. मृतांमध्ये वर, त्याची वहिनी आणि भाच्यासह तीन जण वराच्या कुटुंबातील आहेत. एएसपी अनुकृति शर्मा यांनी घटनास्थळी पाच जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आणि पाच जण जखमी असल्याचे सांगितले. गाडीत एकूण १४ जण होते.

लग्नाचा आनंद क्षणात शोकात बदलला

या अपघाताने लग्नाचा आनंद क्षणात शोकात बदलला. यात वर सूरजपाल (सुखराम यांचा मुलगा), त्याची वहिनी आशा (लाल सिंग यांची पत्नी), आशाची दोन वर्षांची मुलगी ऐश्वर्या, दोन वर्षांचा विष्णू (मनोज यांचा मुलगा) आणि एका अज्ञात व्यक्तीचा घटनास्थळी मृत्यू झाला. जखमी अवस्थेत रवि (बच्चू सिंग यांचा मुलगा), वराची बहीण कोमल, हिमांशु आणि दोन अज्ञात व्यक्तींना हायर सेंटरला पाठवण्यात आले. उपचारावेळी तीन जणांचा मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT