Tragic Incident in South-East Delhi Saam Tv News
देश विदेश

मोठी बातमी! जुन्या मंदिराची भिंत कोसळली; ७ जणांचा जागीच मृत्यू, ४ जण एकाच कुटुंबातले

Delhi Temple Wall Collapse: जुने मंदिर कोसळून हरी नगर, जैतपूर येथे मोठी दुर्घटना. भिंत कोसळून ८ लोक गाडले गेले, त्यापैकी ७ जणांचा मृत्यू. मृतांमध्ये चार जण एकाच कुटुंबातील.

Bhagyashree Kamble

जुने मंदिर कोसळून हरी नगर, जैतपूर येथे मोठी दुर्घटना

भिंत कोसळून ८ लोक गाडले गेले, त्यापैकी ७ जणांचा मृत्यू

मृतांमध्ये चार जण एकाच कुटुंबातील

घटनास्थळी अजूनही बचाव व शोधमोहीम सुरू

दिल्लीच्या दक्षिण-पूर्व भागातील जैतपूर येथील हरी नगर परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. हरी नगर परिसरातील एका जुन्या मंदिराची भिंत कोसळली आहे. भिंत कोसळल्यामुळे ८ जण ढिगाऱ्याखाली दबले, त्यापैकी ७ जणांचा मृत्यू झाला असून यात एकाच कुटुंबातील चार जणांचा समावेश आहे. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या मंदिरातील भिंत कोसळल्यामुळे ढिगाऱ्याखाली लोक दबले गेले. भिंत पडल्यानंतर आवाज इतका मोठा आला की, आजूबाजूच्या घरांमधील लोक घाबरले. सध्या अग्निशमन दलाकडून ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहे.

हरी नगरमधील भिंत कोसळण्याच्या घटनेबद्दल अतिरिक्त डीसीपी ऐश्वर्या शर्मा यांनी सांगितले की, 'या परिसरात एक जुनं मंदिर आहे. त्याच्या शेजारी जुन्या झोपडपट्ट्या आहेत. जिथे भंगार विक्रेते राहतात. रात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस बरसत होता. मुसळधार पावसामुळे भिंत कोसळली. या भिंतीखाली ८ लोक अडकले होते. बचाव पथकानं ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढले'.

'तसेच रूग्णालयात नेण्यात आले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे. ३-४ लोक गंभीर जखमी आहेत. भविष्यात अशी घटना घडू नये म्हणून आम्ही आता या झोपडपट्ट्या रिकाम्या केल्या आहेत', असं ते म्हणाले.

अपघात घडण्यामागचं कारण काय?

प्राथमिक माहितीनुसार, इमारत जुनी होती. बांधकामातीली त्रुटींमुळे भिंत कोसळली असावी, अशी माहिती आहे. प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, या अपघातामुळे दिल्लीतील जुन्या इमारतींच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Decision: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! गणेश उत्सवानिमित्त प्रवाशांसाठी रेल्वेने घेतला मोठा निर्णय

Shrirampur Crime : हातात बंदुका घेऊन पाठलाग; श्रीरामपुरमध्ये टोळी युद्धाची भीती, घटना सीसीटीव्हीत कैद

Viral Video: आधी हात जोडून नमस्कार केला, मग एक मराठा, लाख मराठा घोषणा दिल्या; फॉरेनरने जिंकली सर्वांचीच मने

Allu Arjun Grandmother Death: अल्लू अर्जुनच्या कुटुंबियांवर कोसळला दु:खाचा डोंगर; जवळच्या व्यक्तीचे निधन

Maharashtra Live News Update: मला जिल्हा परिषद अध्यक्ष करा - हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT