Teen athlete dies after hunting misfire Saam Tv
देश विदेश

Shocking: शिकारीदरम्यान भयंकर घडलं, खारीवरील नेम चूकला अन् मित्राच्या डोक्यातून गोळी आरपार गेली; तरुणाचा मृत्यू

Teen athlete dies after hunting misfire: अमेरिकेमध्ये एका तरुणाचा शिकारीदरम्यान मृत्यू झाला. मित्राने शिकारीसाठी नेम धरला पण नेम चुकला आणि बंदुकीतून सुटलेली गोळी तरुणाच्या डोळ्यात घुसली. या घटनेत तरुणाचा मृत्यू झाला.

Priya More

Summary -

  • अमेरिकेतील लोवा राज्यात शिकारीदरम्यान १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.

  • मित्राचा खारीवर नेम चुकला आणि गोळी थेट कार्सनच्या डोक्यात घुसली.

  • कार्सन हा वॉशिंग्टन हायस्कूलचा विद्यार्थी आणि फुटबॉल खेळाडू होता.

  • पोलिसांनी अपघाताचा तपास सुरू केला आहे.

शिकारीला गेले असता एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. खारीवरील नेम चूकला अन् गोळी मित्राच्या डोक्यात घुसली. या घटनेमध्ये १७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना अमेरिकेतील लोवा येथे घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, वॉशिंग्टनमध्ये शिक्षण घेणाऱ्या १७ वर्षीय कार्सन रेयान या तरुणाचा शिकारीदरम्यान मृत्यू झाला. तो आपल्या काही मित्रांसोबत शिकार करण्यासाठी जंगलामध्ये गेला होता. त्याच्यासोबत असलेल्या एका मित्राने खार समजून गोळी मारली आणि त्याचा नेम चुकला. बंदुकीतून सुटलेली ही गोळी थेट कार्सन रेयान या तरुणाला लागली. कार्सनच्या डोक्यातून गोळी आरपार गेली. या घटनेत तो गंभीर जखमी झाला.

तरुणाला जखमी अवस्थेत तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. पण उपचारापूर्वी डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. ही घटना शनिवारी घडली. सुरूवातीला हा अपघात असल्याचे म्हटले जात होते. पण गोळीबार करणाऱ्या तरुणाने असा दावा केला की तो खारीला लक्ष्य करत होता आणि ही घटना घडली. पोलिस सध्या या प्रकरणाचा कसून तपास करत आहे.

दरम्यान, कार्सन वॉशिंग्टन हायस्कूलमध्ये सीनियर होता आणि त्याला फुटबॉलमध्ये करिअर करायचे होते. त्याच्या टीमने फेसबुक पोस्टमध्ये लिहिल्या असून त्यामध्ये त्याच्या मृत्यूने खूप दु:ख झाल्याचे सांगण्यात आले. कार्सन हुशार मुलगा होता आणि तो नेहमी आव्हाने स्वीकारत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्सनच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी धर्मादाय संस्थेद्वारे निधी उभारला जात आहे. आतापर्यंत त्याच्या कुटुंबासाठी मदत म्हणून सुमारे $54,000 जमा झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: 26 त्र्यंबकेश्वरातील प्रवेश कर कायमस्वरूपी रद्द; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाशिकमध्ये घोषणा

Kamaltai Gawai : एकजीव आणि सक्षम राष्ट्र निर्माण करायला हवं; कमलताई गवईंनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला काय सल्ला दिला?

Nagpur Brain Fever: मेंदूज्वर सदृश्य आजाराचा वाढला धोका, मेंदूज्वराने 10 बालकांचा बळी

IND Vs PAK सामना 'या' हल्ल्यामुळे थांबला, स्टेडियम धुराने भरले; पाहा नेमकं काय घडलं? VIDEO

Crime News: बहीण आणि पत्नीचं भांडण सोडवायला गेला; संतापलेल्या बायकोने नवऱ्याचा प्रायव्हेट पार्ट कापला

SCROLL FOR NEXT