Gujarat Accident Saam Tv
देश विदेश

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! भरधाव ट्रकची कारला धडक; एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

Gujarat Accident: गुजरातच्या वलसाडमध्ये भीषण रस्ते अपघात झाला. भरधाव ट्रकने कारला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये ७ जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण जखमी झाले.

Priya More

Summary -

  • गुजरातमध्ये भीषण रस्ते अपघात झाला

  • वलसाड जिल्ह्यातील कुंभघाटाजवळ कार-ट्रकची समोरासमोर धडक

  • या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू झाला

  • एक व्यक्ती गंभीर जखमी असून रुग्णालयात उपचार सुरू

गुजरातमध्ये भीषण रस्ते अपघात झाला असून यामध्ये ७ जणांचा दु्र्दैवी मृत्यू झाला. वलसाड जिल्ह्यातील कपराडा परिसरातील कुंभघाटाजवळ पहाटेच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली. भरधाव कार आणि ट्रक यांची समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला. या अपघातामध्ये एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुजरात पोलिस अपघाताचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातामध्ये मृत्यू झालेले सर्वजण अंबा वन परिसरात राहणारे होते. मृत्यू झालेले सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याचे सांगितले जात आहे. हे सर्वजण कारमधून कापराडाहून नानापोडा येथे जात होते. त्याचवेळी कुंभघाटा येथे त्यांच्या कारला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती की कारचा चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हा अपघात नेमका कसा झाला यामागचे कारण समोर आले नाही.

या अपघातामध्ये ७ जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मृतांचे मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. तर जखमीला तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमीची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघातामध्ये कुंभघाट परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update :मुंबईचे डबेवाले आजपासून सहा दिवस सुटीवर

लिव्ह-इन रिलेशनशिपमधील जोडप्यांना नवरा-बायको समजलं जाणार? जनगणनेच्या नव्या नियमामुळे चर्चांना उधाण

Heart attack: हार्ट अटॅकपूर्वी दिसणाऱ्या या ५ लक्षणांकडे महिला करतात हमखास दुर्लक्ष; शरीरात होणारे बदल ओळखा

Gold Rate Today: खुशखबर! सराफा बाजार उघडताच सोनं झालं स्वस्त; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Phone Charging Tips : चार्जर नाही, तर काय झाले; 'या' स्मार्ट ट्रिक्स वापरून मिनिटांत मोबाईल फोनची बॅटरी होईल फुल

SCROLL FOR NEXT