Major Accident  Saam tv
देश विदेश

Major Accident : गुटखा खाताना चालकाने स्टेअरिंग सोडली, महाकुंभमेळ्याला जाणारी भाविकांची बस उलटली, अपघातात एकाच मृत्यू

Major Accident in Uttar Pradesh : गुटखा खाताना स्टेअरिंग सोडली, त्यानंतर भाविकांच्या बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे.

Vishal Gangurde

नेपाळहून महाकुंभमेळ्याला जाणारी भाविकांची बस उत्तर प्रदेशच्या गाजीपूर वाराणसी हायवेवर उलटल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात बसमधील प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर बसमध्ये खळबळ उडाली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हायवेवर झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे.

उत्तर प्रदेशच्या गाजीपूर वाराणसी हायवेवर स्थानिक लोक आणि पोलिसांद्वारे जखमींना रेस्क्यू करण्यात आलं आहे. अपघातामधील जखमींना मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं. या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घोषणा डॉक्टरांनी केली. अपघातामधील २४ जखमींवर मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरु आहेत.

गाजीपूर वाराणसी हायवेवर सकाळी भीषण अपघात झाला. नेपाळच्या बारा जनपदहून महाकुंभमेळ्यात स्थान करण्यासाठी ४२ प्रवासी प्रयागराज आणि वाराणसीसाठी निघाले होते. त्यावेळी बसच्या ड्रायव्हरने गुटख्याची पुडी फोडून तोंडात टाकली. त्यानंतर चालकाने दुसरंही गुटख्याची पुडी फोडली. त्यावेळी चालकाने स्टेअरिंग सोडली. त्यानंतर दोन्ही हातांनी गुटख्याची पुडी तोंडात टाकू लागला. त्यावेळी बस उलटली. यानंतर एकच खळबळ उडाली. अपघातानंतर आजूबाजूचे लोकही मदतीला धावले.

काही लोकांनी ११२ वर फोन करून माहिती दिली. स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार, स्थानिक पोलीस मदतीला धावले. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अनेक भाविक बसखाली दबले गेले. जखमींना अनेक प्रयत्नानंतर बस बाहेर काढण्यात आलं. यावेळी डॉक्टरांनी एकाला मृत घोषित केले.

मेडिकल कॉलेजचे प्रिसिंपल आनंद मिश्रा यांनी सांगितलं की, २५ जखमींना आपत्कालीन वॉर्डात दाखल करण्यात आलं. त्यातील एकाचा मृत्यू झाला. त्यातील २४ जणांचीही प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. तिघांवर सीटी स्कॅनद्वारे उपचार सुरु करण्यात येत आहे. एका जखमी भाविकाला हाताला मोठी दुखापत झाली आहे. किरकोळी जखमींना मेडिकल कॉलेजकडून दूध, ब्रेड आणि नाष्टा दिला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat: भोंदू खरातचा पंचतारांकित 'अड्डा', मुंबईतल्या हॉटेलमधून चालवायचा हवाला रॅकेट

White House Firing: मोठी बातमी ! अमेरिकेच्या व्हाइट हाउसजवळ गोळीबार

Maharashtra Politics: शरद पवारांची दिल्लीवारी, उद्या होणार शपथविधी

India vs Pakistan: भारतावर हल्ला करणार, पाकिस्तानची पोकळ धमकी

Mumbai Local: हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत, सिवूड्स ते जुईनगरदरम्यान तांत्रिक बिघाड; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT