Bus Accident Saam Tv
देश विदेश

Accident : ४२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्लिपर बसचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, ८ जण जखमी

Delhi Mumbai Expressway Bus Accident : दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर पहाटे भीषण बस अपघात झाला. २ जणांचा जागीच मृत्यू झाला असून ८ प्रवासी गंभीर जखमी आहेत. पोलिस तपास सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Alisha Khedekar

  • दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर खासगी बसचा भीषण अपघात

  • अपघातात दोन ठार, आठ जण गंभीर जखमी

  • बसच्या पुढील भागाचा चुराडा

  • अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल

दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठा अपघात झाला आहे. ४२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खासगी बसचा भीषण अपघात झाला. एका गाडीने दिल्लीहून इंदूरला जाणाऱ्या स्लीपर कोच बसला धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात २ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ८ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोटा जिल्ह्यातील कैथुन पोलीस स्टेशन परिसरातील अरनखेडा गावाजवळील दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर हा अपघात झाला. पहाटे ४:३० च्या सुमारास एका अज्ञात वाहनाने बसला धडक दिल्याने बस थेट डिव्हायडरला धडकली. या धडकेत बसच्या पुढील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला.

शिवाय या दुर्घटनेत ८ जण गंभीर जखमी झाले असून दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये चालकाचाही समावेश असल्याचे वृत्त आहे. अपघात इतका भीषण होता कि बसचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. याप्रकरणी पोलिसांना पाचारण करण्यात आलं. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी जखमींना जवळच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

अधिकारी संदीप शर्मा म्हणाले की, "घटनेची माहिती मिळताच, जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथून त्यांना कोटा येथे रेफर करण्यात आले. एसएचओने पुढे स्पष्ट केले की, अपघात इतका भीषण होता की बसच्या पुढच्या भागाचा पूर्णपणे चुराडा झाला. मृतांमध्ये मंदाना येथील रहिवासी गिरिराज रेबारी आणि बोरखेडा येथील रहिवासी श्यामसुंदर सेन यांचा समावेश आहे. अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. बस क्रेनच्या सहाय्याने काढून बाजूला काढून वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kelvan Ceremony: केळवण म्हणजे काय? लग्नाआधी ते का करतात?

Maharashtra Live News Update: एकाच व्यासपीठावर दोन पिक्चर, भाजप आणि शिवसेनेची एकाच मंचावर सभा

Kidney Stone: कोणत्या भाज्या कच्च्या खाऊ नयेत? किडनी स्टोनचा धोका टाळण्यासाठी उपाय

Mumbai : लिंक रोड,टनेल रोड ते कोस्टल रोड, मुंबईचा कायापालट होणार ; मेट्रोच्या बड्या अधिकाऱ्यानं सांगितला रोड मॅप

Bigg Boss 19: 'बिग बॉस'च्या घरात राडा, मालतीने फरहानाला लाथ मारली अन् टेबल..., पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT