Toxic Cough Syrup  Saam tv
देश विदेश

Child Safety Alert : कफ सिरप प्यायल्याने ६ चिमुकल्यांचा मृत्यू; २ औषधांवर तात्काळ बंदी, धक्कादायक कारण समोर

Toxic Cough Syrup : कफ सिरप प्यायल्याने ६ चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीये. या घटनेचं धक्कादायक कारण समोर आलंय.

Vishal Gangurde

६ चिमुकल्यांचा मृत्यू कफ सिरपमुळे झाल्याची घटना

कोल्ड्रिफ आणि नेक्सट्रस्ट डीएस या दोन कफ सिरपवर बंदी .

सिरपमधील औषधातील घटकांमुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न

औषधे देण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या, असा प्रशासनाचा इशारा

मध्य प्रदेशच्या छिंदवाडा येथील कोयलांचलमध्ये कफ सिरप प्यायल्याने ६ चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. चिमुकल्यांच्या मृत्यूने एकच खळबळ उडाली आहे. कफ सिरप प्यायल्याने चिमुकल्यांची किडनी खराब होऊन मृत्यू झाल्याचं कारण समोर आलं आहे. या सिरपमुळे चिमुकल्यांना सर्दी-खोकला व्हायचा. या घटनेनंतर दोन औषधांवर बंदी घालण्यात आली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, भोपाळमध्ये आरोग्य विभागाने २ कफ सिरफवर बंदी घातली आहे. प्रशासनाने कोल्ड्रिफ आणि नेक्सट्रॉस डीएस कफ सिरप विक्रीवर बंदी घातली आहे. आरोग्य अधिकारी डॉक्टर मनीष शर्मा यांच्या आदेशनानंतर दोन कफ सिरपवर बंदी घालण्यात आली आहे. दोन्ही औषधे भोपाळमधील सरकारी आरोग्य केंद्रात उपलब्ध नसतात. भोपाळच्या खासगी औषधांच्या दुकानात दोन्ही कफ सिरप उपलब्ध व्हायची.

या घटना २० सप्टेंबर रोजी घडल्या. परासिया. उमरेठ, जाटाछापर, बडकुही विभागातील चिमुकले मुलं आजारी पडू लागले आहेत. या चिमुकल्यांच्या नातेवाईकांनी खासगी औषधांच्या दुकानांमधून खरेदी केलं होतं. त्यानंतर या लहान मुलांची तब्येत बिघडली होती. तर नागपूरमध्येही एक चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, छिंदवाडाचे जिल्हाधिकारी शीलेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिमुकल्यांचा मृत्यू साथीच्या आजाराने झाला नव्हता. लहान मुलांची रक्त चाचणी केली. त्यावेळी कोणत्याही प्रकारचा व्हायरस किंवा बॅक्टेरियाची लागण झाल्याचं आढळलं नाही.

आयसीएमआर दिल्ली आणि भोपाळच्या टीमने तपासणी करताना बायोप्सी केली. त्यावेळी लहान मुलांच्या किडनी कफ सिरपमुळे बिघड्याचं समोर आलं. या घटनेनंतर घरातील मुले आजारी पडल्यानंतर डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय औषधे देऊ नयेत, असा सल्ला प्रशासनाने दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bacchu Kadu: बच्चू कडूंचा महाएल्गार मोर्चा, नागपूरात चक्काजाम, प्रकाश आंबेडकरांचा खोचक टोला

Eknath Khadse: एकनाथ खडसेंच्या घरावर दरोडा, जळगावच्या घरातून सोनं, रोकड लंपास

IND VS AUS: एकमेव 'या' भारतीय फलंदाजाने टी-२० क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाला धुतलं, ठोकलं दमदार शतक

Maharashtra Flood: अतिवृष्टीग्रस्तांना आतापर्यंत 8 हजार कोटींची मदत, पुढच्या 15 दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 11 हजार कोटी

Narayan Rane : ...म्हणून मी शिवसेना सोडली; भाजप खासदार नारायण राणेंनी सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT