School Explosion At Bangui saam Tv
देश विदेश

Blast In School: हायस्कूलमध्ये मोठा स्फोट; विस्फोटानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत 29 मुलांचा मृत्यू

School Explosion At Bangui: एका शाळेत गुरुवारी झालेल्या स्फोटात आणि त्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत २९ मुलांचा मृत्यू झालाय. तर २६० जण जखमी झालेत. जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने एका निवेदनातून दिलीय.

Bharat Jadhav

Central African Republic Stampede: मध्य आफ्रिकन रिपब्लिकच्या राजधानीतील एका शाळेत गुरुवारी स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत २९ मुलांचा मृत्यू झालाय. तर २६० जण जखमी झाले. देशाच्या राष्ट्रीय शिक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, बुधवारी बांगुई येथील बार्थेलेमी बोगांडा हायस्कूलच्या कॅम्पसमध्ये एका बिघाड झालेल्या ट्रान्सफॉर्मरला वीजपुरवठा केला जात असताना हा स्फोट झाला. (Central African Republic school tragedy, Transformer Blast At Bangui High School)

आरोग्य मंत्रालयाने एका निवेदनात म्हटलंय की, स्फोटानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत १६ विद्यार्थिनींसह बहुतेक बळींचा जागीच मृत्यू झाला, तर काहींचा रुग्णालयात मृत्यू झाला. मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, किमान २६० लोक जखमी झाले आहेत आणि त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेच्या वेळी सुमारे ५,००० विद्यार्थी परीक्षेला बसण्यासाठी शाळेत उपस्थित होते. त्याचवेळी वीजपुरवठा करण्यात येत होता, तेव्हा स्फोट झाला. त्यामुळे परीक्षार्थींमध्ये घबराट पसरली. भीतीमुळे विद्यार्थी धावपळ सुरू झाली. या धावपळीत चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेबाबत एका विद्यार्थ्याने माध्यमांशी बोलताना आपबीती सांगितली.

"आम्ही परीक्षेच्या हॉलमध्ये असताना आम्हाला मोठा स्फोट ऐकू आला. सर्वजण सर्व दिशेने पळू लागले. अनेक वर्गमित्र पडले आणि पुन्हा उठू शकले नाहीत," अशी माहिती रुफिन पांडामा या विद्यार्थ्याने सांगितले. मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, आज सकाळी तांत्रिक बिघाड झाल्यानंतर, एनर्जी सेंट्राफ्रिकेन (ENERCA) ची एक टीम दुरुस्तीचे काम करण्यासाठी पाठवण्यात आली.

दरम्यान अधिकाऱ्यांनी अद्याप बळींची नेमकी संख्या जाहीर केलेली नाही. निवेदनानुसार, शाळेतील दोन्ही परीक्षा केंद्रांवर एकूण ५,३११ उमेदवार उपस्थित होते. दोन रुग्णालयांमधून मिळालेल्या माहितीनुसार, तात्पुरत्या मृतांची संख्या किमान १० आहे, तर अनेक जण गंभीर जखमी आहेत.

घटनेची परिस्थिती स्पष्ट करण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या जातील आणि उर्वरित परीक्षा सत्र पुन्हा सुरू करण्याची तारीख पुढील निवेदनात जाहीर केली जाईल, असे मंत्रालयाने पुढे म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'Saiyara' तू तो बदला नहीं है... या ट्रेंडींग गाण्याचा अर्थ काय?

Asia Cup 2025 schedule : भारत-पाकिस्तान भिडणार, तारीख ठरली! आशिया चषक स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक

Bhaskargad : मित्रांसोबत नाशिकला गेलाय? 'भास्करगड'ची आवर्जून सफर करा

Maharashtra Live News Update: पोहण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू,नागपूरमधील घटना

Gautam Gambhir : टीम इंडियाची अवस्था 'गंभीर'; जबाबदार कोण? आकडेवारी चिंता वाढवणारी

SCROLL FOR NEXT