Massive Crowd During Kartiki Ekadashi Causes Stampede Saam
देश विदेश

कार्तिकी एकादशीला भयंकर घडलं; वेंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी, ९ जणांचा जागीच मृत्यू, धक्कादायक VIDEO समोर

Massive Crowd During Kartiki Ekadashi Causes Stampede: आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील वेंकटेश्वर स्वामी मंदिरात भयंकर घडलं. चेंगराचेंगरीत ९ जणांचा जागीच मृत्यू.

Bhagyashree Kamble

  • वेंकटेश्वर स्वामी मंदिरात भाविकांची चेंगराचेंगरी.

  • नऊ जणांचा जागीच मृत्यू.

  • मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त.

आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील काशीबु्ग्गा स्थित वेंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत किमान नऊ भाविकांचा मृत्यू झाला. तर, अनेक भाविक जखमी असल्याची माहिती आहे. त्यांची प्रकृती गंभीर असून, त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

कार्तिकी एकादशीनिमित्त आज भाविकांनी वेंकटेश्वर स्वामी मंदिरात गर्दी केली. या गर्दीत चेंगराचेंगरी झाली. सध्या पोलिसांकडून गर्दीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कार्तिकी एकादशीनिमित्त भाविकांनी पहाटेपासून काशीबु्ग्गा स्थित वेंकटेश्वर स्वामी मंदिरात गर्दी गेली होती. भाविकांची सकाळपासूनच अलोट गर्दी पाहायला मिळाली. प्राथमिक माहितीनुसार, मंदिर संकुलाच्या प्रवेशद्वाराजवळ अचानक गर्दी वाढली. ज्यामुळे भाविकांमध्ये घबराट निर्माण झाली. नंतर काही वेळातच गर्दी वाढल्यामुळे चेंगराचेंगरी झाली. भाविक एकमेकांच्या अंगावर कोसळू लागले.

माहितीनुसार, या अपघातात आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेक जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. चेंगराचेंगरी झाल्यानंतर स्थानिक रहिवाशांनी आणि पोलिसांनी गंभीर जखमी व्यक्तींना रूग्णालयात दाखल केलं. स्थानिक सूत्रांच्या म्हणण्यानुसार, हा आकडा आणखी वाढू शकतो.

प्रत्यक्षदर्शींच्या मते, गर्दीला नियंत्रण करण्यासाठी पुरेसे बॅरिकेड्स किंवा सुरक्षा कर्मचारी तैनात नव्हते. गर्दी वाढत गेली आणि ही घटना घडली. दरम्यान, भाविकांकडून मंदिर व्यवस्थापनावरही प्रश्न उपस्थित केले जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी तीव्र दु:ख व्यक्त करत ट्विट केलं आहे. जखमींवर त्वरीत आणि प्रभावी उपचार करण्याचे आदेश दिले असल्याचं त्यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : पुण्यात अपघाताचा थरार! दोन जणांचा जागीच मृत्यू, कारचा चक्काचूर

Maharashtra Live News Update: महाडमध्ये मनसे पधिकाऱ्याला मारहाण

Shocking: पोलिस चौकीसमोर मर्डर; बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या भावाची धारदार शस्त्राने केली हत्या, परिसरात खळबळ

Pune Car Accident : कोरेगाव पार्कात भयानक अपघात, कार वेगात मेट्रोच्या खांबाला धडकली, दोघांचा मृत्यू,थरारक CCTV व्हिडिओ

सोनं आजच खरेदी करा; २,६२० रूपयांनी स्वस्त, चांदीच्या दरातही कमालीची घट, जाणून घ्या लेटेस्ट दर

SCROLL FOR NEXT