bharat band Saam tv
देश विदेश

बँक, शाळा आणि ऑफिस..., भारत बंदची उद्या हाक; काय सुरू अन् काय बंद राहणार?

bharat band : कामगार संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. या बंदमुळे काही जिल्ह्यात शाळा, बँक बंद राहण्याची शक्यता आहे.

Vishal Gangurde

भारत बंदची घोषणा १२ फेब्रुवारी रोजी करण्यात आलीये

देशातील १० हून अधिक कामगार आणि शेतकरी संघटनांचा सहभाग

३० कोटी कामगार सहभागी होण्याचा दावा संघटनेने केला आहे

देशात १० हून अधिक कामगार संघटना आणि शेतकरी संघटनांनी १२ फेब्रुवारी रोजी भारत बंदची घोषणा केली आहे. केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात बंदची हाक दिली आहे. या आंदोलनात ३० कोटी कामगार सहभागी होणार असल्याचा दावा कामगार संघटनांनी केला आहे. मागील आंदोलनापेक्षा या आंदोलनात जास्त कामगार सहभागी होतील, ऑल इंडिया ट्रेड यूनियन काँग्रेसचे महासचिव अमरजीत कौर यांनी केला आहे. ९ जुलै २०२५ रोजी झालेल्या आंदोलनात २५ कोटी लोक सहभागी झाले होते.

कामगार संघटनाच्या दाव्यानुसार, भारत बंदचा देशातील ६०० हून अधिक जिल्ह्यांवर परिणाम पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मागील आंदोलनाचा परिणाम हा ५५० जिल्ह्यांवर पाहायला मिळाला होता. संयुक्त किसान मोर्चा, कृषी मजदूर संघटना, विद्यार्थी आणि युवा संघटनांनी या भारत बंदला पाठिंबा दर्शवला आहे.

काय बंद राहणार ?

सरकारी बँका आणि विमा कार्यालये

औद्योगिक युनिट्स, मॅन्युफॅक्चरिंग हब

कोळसा, स्टील आणि इतर प्रमुख क्षेत्र

मनरेगा अंतर्गत ग्रामीण रोजगाराची कामे

काही शहरातील सरकारी कार्यालये

देशातील काही राज्यात एसटी बंद

कोणत्या सेवा सुरू राहतील?

मेट्रो सेवा

शाळा आणि महाविद्यालये (राज्य सरकार निर्णय घेईल)

दूध, औषधे आणि इतर अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरू राहतील

रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक आरोग्य सेवा सुरू राहतील

देशातील रुग्णालये, आपत्कालीन सेवा

खासगी कार्यालये आणि आयटी कंपन्या

भारत बंद कधी जाहीर करण्यात आलाय?

देशव्यापी भारत बंदची घोषणा उद्या म्हणजे १२ फेब्रुवारी रोजी करण्यात आली आहे.

देशातील किती जिल्ह्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे?

भारतातील ६०० हून अधिक जिल्ह्यांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT