cough syrup  Saam
देश विदेश

Cough Syrup Deaths : 2 राज्य, एक गंभीर आजार आणि १२ लहान मुलांचा मृत्यू; विषारी औषध आणखी किती जणांचा जीव घेणार?

Cough Syrup Deaths update : मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये १२ लहान मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या वाढत्या घटनेमुळे पालकांची चिंता वाढली आहे.

Vishal Gangurde

मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये १२ लहान मुलांचा कफ सिरपमुळे मृत्यू

सर्व मुले ५ वर्षांखालील होती.

कफ सिरप प्यायल्यानंतर किडनी फेल होण्याचे प्रकार समोर

या प्रकरणी डॉक्टर आणि फार्मासिस्ट निलंबित

मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कफ सिरप प्यायल्याने १० हून अधिक लहान मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मागील २५ दिवसांत आतापर्यंत १२ लहान मुलांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती हाती आली आहे. लहान मुलांना सर्दी आणि खोकला झाल्यानंतर कफ सिरप पाजलं. मात्र, पुढील काही दिवसांत या लहान मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीये.

कफ सिरप पिऊन मृत्यूमुखी पडलेले सर्व लहान मुले ५ वर्षाखालील होती. या लहान मुलांना ताप आणि सर्दीचा त्रास झाला होता. त्यानंतर स्थानिक डॉक्टरांनी त्यांना खोकल्याचं औषध दिलं. खोकल्याचं हे औषध प्यायल्यानंतर या लहान मुलांची तब्येत बिघडली. काही दिवसांनी या लहान मुलांचं लघवी करण्याचे प्रमाण कमी झालं. पुढील काही दिवसांत या लहान मुलांची किडनी फेल झाली. याआधी ६ लहान मुलांचा मृत्यू झाला होता. मात्र, या प्रकरणात आकडा वाढतच चालला आहे.

कफ सिरप प्रकरणामुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. छिंदवाडा या भागात या प्रकरणाचा अधिक प्रभाव दिसत आहे. मध्य प्रदेश व्यतिरिक्त राजस्थानच्या भरतपूर आणि सीकरमध्ये तीन मुलांचा कफ सिरप पिऊन झाल्याचं समोर आलं आहे. यामुळे राजस्थानच्या नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.

कफ सिरपचं हे पहिलं प्रकरण ७ सप्टेंबर रोजी समोर आलं होतं. ५ वर्षीय अदनान खानला ताप आणि उलट्या झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अदनानची तब्येत आणखी वाढल्याने पुढील उपचारासाठी नागपूरला पाठवण्यात आलं होतं. त्यावेळी डॉक्टरांनी अदनानच्या दोन्ही किडनी फेल झाल्याचं सांगितलं. त्यानंतर मध्य प्रदेशातील विविध भागात ९ लहान मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.

प्रशासनाने सुरुवातीला पाणी आणि उंदराचे नमुने घेतले होते. मात्र, त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. राजस्थानमध्ये कफ सिरपमुळे ३ मुलांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही राज्यात मिळून १२ मुलांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने या प्रकरणानंतर डॉक्टर आणि फार्मासिस्टला निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. या संपूर्ण प्रकरणात आरोग्य विभागाने महत्वाच्या सूचना देखील जारी केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ट्रक भरधाव वेगात आला अन् वाहनांना उडवत गेला, पुण्यात भीषण अपघाताचा थरार

SBI Recruitment: स्टेट बँकेत नोकरीची संधी; १.३५ कोटींचं पॅकेज मिळणार; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Maharashtra Live News Update: मावळमध्ये महाविकास आघाडीची घोषणा, पाच पक्ष आले एकत्रित, पण सत्ता मिळेल का?

Cyclone Alert : ‘मोंथा’ चक्रीवादळाचा महाराष्ट्राला तडाखा! राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, कोणत्या जिल्ह्यात कोसळधार?

Bihar Chhath Puja : छठ पूजेच्या उत्सवावर दु:खाचा डोंगर, बिहारमध्ये ८३ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT