Top Billionaires Saam Tv
देश विदेश

Top Billionaires: अंबानींना मागे टाकत अदानी बनले आशियातील सर्वात जास्त श्रीमंत व्यक्ती

जगभरातील शेअर बाजारातील (Share Market) सततच्या घसरणीचा मोठा परिणाम अब्जाधीशांच्या संपत्तीवर झाला आहे.

वृत्तसंस्था

Forbes Real Time Billionaires List: जगभरातील शेअर बाजारातील (Share Market) सततच्या घसरणीचा मोठा परिणाम अब्जाधीशांच्या संपत्तीवर झाला आहे. यामुळे अब्जाधीशांच्या क्रमवारीतही बदल झाला आहे. या अदानी समूहाचे (Adani Group) गौतम अदानी (Gautam Adani) आता आशियातील (Asia) सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. याआधीही संपत्तीच्या रेसमध्ये ते मुकेश अंबानींच्या (Mukesh Ambani) जवळ आले होते, परंतु ते पुढे जाऊ शकले नव्हते. परंतु आता गौतम अदानी जगातील 10 श्रीमंत व्यक्तींपैकी एक बनले आहेत.

फोर्ब्सच्या रिअल टाइम यादीनुसार, गौतम अदानी आणि समूह सध्या 90 बिलियन डॉलर संपत्तीसह 10 व्या क्रमांकावर आहे. गेल्या 24 तासांत त्यांची संपत्ती 672 मिलियन डॉलर कमी झाली असली तरी, इतर अव्वल अब्जाधीशांना मात्र याचा अधिक फटका बसला आहे. दीर्घ काळापासून भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अबानी यांच्या संपत्तीत गेल्या 1 दिवसात 2.2 बिलियन डॉलरची घट झाली आहे. यामुळे त्यांची एकूण संपत्ती 89 बिलियन डॉलर झाली. मुकेश अंबानी आता जागतिक स्तरावर 11 व्या क्रमांकावर आणि भारत आणि आशियामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

अदानी, अंबानी या दोघांच्या मागे झुकेरबर्ग!

फेसबुकच्या मार्क झुकेरबर्गला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. गुरुवारी कंपनीच्या शेअर्समध्ये 26 टक्के घसरण झाल्यामुळे झुकरबर्गची संपत्ती खाली गेली. अशा प्रकारे त्यांची एकूण संपत्ती 84.8 बिलियन डॉलरवर आली. त्यामुळे ते सध्या अदानी आणि अंबानी यांच्यानंतर 12 व्या क्रमांकावर आहे.

नुकसान तरीही एलोन मस्क पहिल्या क्रमांकावर!

शेअर बाजारातील ताज्या घसरणीमुळे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क (Elon Musk) यांनाही फटका बसला आहे. गेल्या 1 दिवसात मस्कच्या संपत्तीत 3.3 अब्ज डॉलरची घट झाली आहे. जरी मस्क अजूनही 232.3 अब्ज डॉलर एवढ्या संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. अॅमेझॉनचे जेफ बेझोस (Jeff Bezos) यांनाही मोठा फटका बसला असून त्यांची 1 स्थान घसरून तिसर्‍या स्थानावर आली आहे. बेझोसची संपत्ती आता 11.8 बिलियन डॉलरने कमी होऊन 164.8 बिलियन डॉलर झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महापालिका निवडणुका एकत्र लढवणार का? एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात विषय संपवला

Pilot Working Time: पायलट आठवड्यातून किती तास काम करतात?

New Year Celebration : न्यू ईअर सेलिब्रेट करायचा आहे? मग भारतातील या ठिकाणी नक्कीच जा

kobi Aloo Matar Bhaji: नुसती कोबीची भाजी खाऊन कंटाळता? हे पदार्थ मिक्स करून होईल चमचमीत भाजी

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत १६५ कोटींचा घोटाळा; १२ हजार पुरुष लाभार्थी; पैसे वसूल करणार

SCROLL FOR NEXT