Tomato market price Today in  Saam tv
देश विदेश

Tomato Price Drop: नागरिकांना स्वातंत्र्य दिनाचं मोठं गिफ्ट; आता टोमॅटो ५० रुपये किलोनं मिळणार, कुठे? वाचा सविस्तर

Tomato Price Drop: स्वातंत्र्य दिनाच्या शुभ मुहूर्तावर टोमॅटो ५० रुपये किलोनं विकण्याची घोषणा केली आहे

Vishal Gangurde

Tomato Price Drop: स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सर्वसामान्यांना दिलासा बातमी हाती आली आहे. सरकारने टोमॅटो ५० रुपये किलो रुपयाने विकण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने स्वातंत्र्य दिनाच्या शुभ मुहूर्तावर टोमॅटो ५० रुपये किलोनं विकण्याची घोषणा केली आहे. (Latest Marathi News)

केंद्राच्या ग्राहक व्यवहार विभागाने एनसीसीएफ (NCCF) आणि नाफेडला (NAFED) टोमॅटो ५० रुपये किलोनं विकण्याच्या सूचना दिल्याची माहिती आहे. दरम्यान, काल १४ ऑगस्टपासूनच दिल्ली-एनसीआरमध्ये टोमॅटोची विक्री सुरू करण्यात आली आहे. नाफेड आणि एनसीसीने आतापर्यंत १५ लाख किलो रुपयांची टोमॅटोची खरेदी आणि विक्री केली आहे.

देशातील अनेक भागात स्वस्त दरात टोमॅटो मिळत आहे. देशात टोमॅटो हे दिल्ली एनसीआर या भागाशिवाय इतर भागातील स्वस्त दरात टोमॅटो मिळत आहे. देशात जोधपूर कोटा, लखनऊ, कानपूर, वाराणसी, प्रयागराज आणि पटना, मुझफ्फरपूर, आराह, बक्सरमध्ये टोमॅटो स्वस्त दरात विकले जात आहेत.

ग्राहकांना मोठा दिलासा

एनसीसीएफ आणि नाफेडने काही दिवसांपूर्वी ९० रुपये प्रतिकिलो दराने विकण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर आज स्वातंत्र्य दिनापासून टोमॅटो ५० रुपये किलोनं विकला जाणार आहे.

पुणे बाजार समितीतही टोमॅटोचे भाव झाले कमी

पुणे बाजार समितीत रविवारी नऊ हजार कॅरेटची आवक झाली. राज्यातील नाशिक, पुणे, मुंबई बाजार समितीत टोमॅटोची आवक वाढल्याची माहिती आहे. टोमॅटीची आवक वाढल्याने पुण्याच्या नारायणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत भाव कमी झाले आहेत.

टोमॅटोची आवक वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटो ५० ते ८५ रुपये प्रतिकिलो बाजारभावाने विकला जात आहे.

दरम्यान, पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील टोमॅटो हा व्यापाऱ्यांनी राज्यातील विविध बाजारपेठमध्ये विक्रीसाठी पाठवला आहे. टोमॅटोचा दर निम्म्याने कमी झाल्याने सर्व तोटा व्यापाऱ्यांना सहन करावा लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिलापटावर अशोक स्तंभ कोरल्यामुळे मोठा वाद; श्रीनगरमध्ये वातावरण तापलं

Special Train: दसरा- दिवाळीसाठी मध्य रेल्वेची खास सुविधा; धावणार विशेष रेल्वे Reservation करता येणार?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

SCROLL FOR NEXT