राजधानी नवी दिल्लीचा पारा ४ अंशांपर्यंत पोहचला (Delhi Temperature) आहे. धुक्यामुळं रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय. थंडीमुळे अनेक राज्यातील शाळांना सुट्या आहेत. धुक्यामुळं दिल्ली विभागातून सुटणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या उशिरानं धावत आहेत. हवामान विभागानं यासाठी काही मार्गदर्शक सूचना देखील जारी केल्या आहेत. (latest Weather update)
सतत धुक्याच्या वातावरणामुळं दिल्लीकरांना सततच्या थंड हवामानासाठी आणि प्रवासादरम्यान सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हवामान विभाग, दिल्लीने १५ आणि १६ जानेवारी २०२४ रोजी देखील दाट धुके (cold wave) राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. आम्ही सर्वांना धुक्यात सावधपणे वाहन चालवण्याचं आवाहन करतो, अशी दिल्ली पोलिसांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केलीय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सर्वात थंड रात्र
भारताच्या हवामान विभागाच्या (IMD) १३ जानेवारीच्या अहवालानुसार दिल्लीमध्ये पारा ३.६ अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याने १३ जानेवारी ही हंगामातील सर्वात थंड रात्र नोंदवली गेली. दाट धुक्यानं शहराच्या विविध भागांना व्यापलं होतं, ज्यामुळे दृश्यमानतेवर लक्षणीय परिणाम झालाय.
१२ जानेवारी रोजी राष्ट्रीय राजधानीत (delhi) किमान तापमान ३.९ अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं होतं. आयएमडीने खुलासा केला की, १३ जानेवारी रोजी कमाल तापमान १८.१ अंश सेल्सिअसवर पोहोचलं होतं. आज दाट धुक्यामुळं देशाच्या विविध भागातून दिल्लीला जाणाऱ्या २२ गाड्या उशिराने धावत आहेत. येत्या १६ जानेवारीपर्यंत वायव्य भारतातील काही भागांमध्ये दाट धुके आणि थंडीची लाट कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली (Weather Update IMD Alert) आहे.
दृश्यमानतेत गंभीर समस्या
या हिवाळ्यात प्रथमच, अमृतसर ते दिब्रुगढ ते गंगानगर, पटियाला, अंबाला, चंदीगड, पालम, सफदरजंग, बरेली, लखनौ, बहराइच, वाराणसी, प्रयागराज आणि आसामच्या तेजपूरपर्यंत देशभरात शून्य दृश्यमानता नोंदवण्यात (Delhi Temperature) आली.
१३ जानेवारी रोजी राष्ट्रीय राजधानीत हंगामातील सर्वात थंड रात्र ३.६ अंश सेल्सिअस नोंदवली गेली. दाट धुक्यामुळं दृश्यमानतेत गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. १३ जानेवारी रोजी सकाळी साडेपाच वाजता दृश्यमानता केवळ २०० मीटर होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.