Petrol Diesel Price Today  Saam Tv
देश विदेश

Petrol Diesel : नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात इंधनाच्या दरात मोठा बदल? जाणून घ्या आजचे दर

जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. दरम्यान, सरकारी तेल कंपन्यांनी सोमवारी सकाळी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झाला असून, बहुतांश शहरांमध्ये इंधनाच्या किमती वाढल्या आहेत. मात्र, दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चारही महानगरांमध्ये आजही पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.(Petrol Diesel Latest Price)

यूपीच्या गौतमबुद्ध नगर (नोएडा-ग्रेटर नोएडा) येथे आज पेट्रोल 0.6 पैशांनी महागले असून 96.65 रुपये इतके झाले आहे. तर डिझेल 96.65 रुपये वाढून 89.82 रुपयांनी विकले जात आहे. यूपीची राजधानी लखनऊमध्ये आज पेट्रोल 11 पैशांनी महाग होऊन 96.44 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे, तर डिझेल 11 पैशांनी वाढून 89.64 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. हरियाणाची राजधानी गुरुग्राममध्ये आज पेट्रोल 5 पैशांनी वाढून 96.89 रुपये प्रति लिटर तर डिझेल 4 पैशांनी वाढून 89.76 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– कोलकात्यात पेट्रोल 06.03 रुपये. डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल.

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात. 

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: अजित पवार विमान अपघात प्रकरणी सर्वात मोठी कारवाई,DGCA ची व्हीएसआरच्या विमान उड्डाणावर बंदी

Wednesday Horoscope : मनासारखा दिवस जाईल, डोके शांत ठेवून काम कराल; ५ राशींच्या लोकांचं नशीब पालटणार

Digital Arrest: फोन आला, कोणी व्हिडिओ कॉल केला तर काय कराल? मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला बचावाचा मार्ग

T20 World Cup : झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्याआधी मोठी अपडेट, मॅच विनर फलंदाजानं अचानक टीम इंडियाची साथ सोडली, कारण चिंताजनक

Maharashtra Live News Update: विक्रोळीतील महालक्ष्मी डेरीतील ‘माझा’ शीतपेयात आढळला कचरा

SCROLL FOR NEXT