Maharashtra Politics : पंकजा मुंडे यांना राज्याच्या राजकारणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या होणाऱ्या जाहीर सभेमध्ये भाजपच्या महिला नेत्या पंकजा मुंडे यांना डावलण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे
Pankaja Munde
Pankaja Munde Saam TV
Published On

Pankaja Munde News : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या होणाऱ्या जाहीर सभेमध्ये भाजपच्या महिला नेत्या पंकजा मुंडे यांना डावलण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. पंकजा मुंडे यांना महाराष्ट्राच्या राजकारणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप माधव बन ओबीसी भटके विमुक्त संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. खुशाल मुंढे यांनी केला आहे. मुंढे यांच्या आरोपानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. (Latest Marathi News)

Pankaja Munde
Eknath Shinde : जिंदाल कंपनीच्या आगीतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

'भाजपच्या नेत्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की या महाराष्ट्रामध्ये आणि देशांमध्ये बहुजनांची एकजूट भाजपच्या पाठीशी उभं करण्याची क्षमता लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी दाखवून दिली आणि त्यानुसारच पंकजा मुंडे या सुद्धा काम करत आहेत. परंतु त्यांना तथाकथित नेते साईटट्रॅक करण्याचा प्रयत्न सातत्याने करत आहेत, असेही डॉ. मुंढे पुढे म्हणाले.

Pankaja Munde
Pune : अजित पवारांनी राजीनामा देत जनतेची माफी मागावी; 'त्या' वक्त्यव्यानंतर धर्मवीर अध्यात्मिक सेना आक्रमक

'भाजपला येत्या 2024 मध्ये त्याची किंमत मोजावी लागेल हे लक्षात ठेवावे बहुजन तथा माळी धनगर वंजारी बंजारा नाभिक व ओबीसी भटके विमुक्त समाज भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभा करावयाचा असेल तर पंकजा मुंडे यांना साईटट्रॅक करून चालणार नाही हे लक्षात ठेवावे यापुढे या पद्धतीने जर वागलात तर महाराष्ट्रभर माधव बन ओबीसी भटके विमुक्त संघर्ष कृती समितीच्या वतीने जनजागृती संवाद यात्रा सुरू केली जाईल, असा इशाराही माधवबन वतीने डॉ. मुंढे यांनी दिला.

दरम्यान, ओबीसी भटके विमुक्त संघर्ष कृती समितीने भाजपवर आरोप केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. या आरोपानंतर भाजप नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येतील, हे पाहावे लागणारआहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com