Eknath Shinde : जिंदाल कंपनीच्या आगीतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

जिंदाल कंपनीला लागलेल्या आगीत दोन जखमी महिलांचा मृत्यू झाला असून या घटनास्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली
CM Eknath shinde
CM Eknath shinde Saam Tv

Eknath Shinde News : नाशिकच्या इगतपुरीमधील जिंदाल कंपनीला भीषण आग लागली. जिंदाल कंपनीला लागलेल्या आगीत दोन जखमी महिलांचा मृत्यू झाला असून या घटनास्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. (Latest Marathi News)

CM Eknath shinde
Nashik News: वर्षाच्या पहिल्याच दिवशी नाशिकमध्ये अग्नितांडव; जिंदाल कंपनीला भीषण आग

जिंदाल कंपनीला आग लागल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पाहणीनंतर मुख्यमंत्र्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'सदर घटना अतिशय गंभीर आहे. ज्वलनशील पदार्थामुळे आग भडकली. आग विझविण्यासाठी आपली यंत्रणा काम करत आहे. जखमी कामगारांमध्ये दोन जणांची प्रकृती अतिशय गंभीर आहे'.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, 'या दुर्घटनेतील जखमींवर शासकीय पैशांनी उपचार होतील. मी जखमींना भेटलो आहे. डॉक्टरांना देखील भेटलो आहे. संपूर्ण उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. तसेच सविस्तर चौकशीतून माहिती समोर येईल'. सध्या इथे कुणीही अडकल्याची शक्यता कमी आहे, असेही त्यांनी सांगितले.

CM Eknath shinde
Aurangabad News: लग्नात त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली आणि होत्याचं नव्हतं झालं; आगीमुळे उभा ऊस जळून खाक

यावेळी पालकमंत्री दादा भुसे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, स्थानिक आमदार यांनी देखील पाहणी केली.

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये फटाका फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. या घटनेवर देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'बार्शी येथील घटनेत देखील उपाययोजना होतील. बचाव करण्याला प्राधान्य दिले जाईल. भविष्यात अशा घटना होऊ नये याची काळजी घेतली जाईल'.

जिंदाल कंपनी आगीचा घटनाक्रम

- ११.३० वाजता स्फोट होऊन आग लागली

- १२.०० वाजेच्या सुमारास अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू

- १२.३० वाजता नाशिक, इगतपुरी आणि जवळपासचे अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल व्हायला सुरुवात

- २.१५ वाजता प्लांटमधील डिझेलचे टँक फुटण्याची भिती असल्यानं संपूर्ण परिसर निर्मनुष्य करण्यात आला

- ३.१५ वाजता पालकमंत्री दादा भुसे, आरोग्य राज्यमंत्री भारती पवार आणि वरिष्ठ अधिकारी घटनस्थळी

- ३.४५ वाजता लष्कराच्या हेलिकॉप्टरकडून घटनास्थळाची पाहणी

- ५.५५ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी पोहचले, त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली

- ६.०० आगीचे लोट कायम, कंपनीच्या परिसरात आग पसरली

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com