Aurangabad News: लग्नात त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली आणि होत्याचं नव्हतं झालं; आगीमुळे उभा ऊस जळून खाक

लग्नात फटाके लावल्याने जवळ असलेल्या उसाच्या शेताला आग लागली आहे.
Aurangabad News
Aurangabad NewsSaam TV

Aurangabad News: लग्न म्हटल्यावर फटाक्यांच्या आतषबाजीसह जल्लोष साजरा केला जातो. सर्वजण डिजेच्या तालावर ठेका धरत नाचत असतात. अशात गंगापूर गावातील एक लग्न शेतकऱ्यांसाठी मोठं विघ्न ठरलं आहे. लग्नात फटाके लावल्याने जवळ असलेल्या उसाच्या शेताला आग लागली आहे. यात शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. (Latest Aurangabad News)

गंगापूर तालुक्यातील लिंबेजळगाव शेत शिवार परिसरात गट नंबर १७ आणि गट नंबर ३३ मध्ये ही दुर्घटना घडली. यात चंद्रशेखर आलोने, अवंतिका आलोने, सुरेश आलोने, दत्तात्रय आलोने आणि सुलेमान खान मोहम्मद या शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे. लग्नाला जाताना रस्त्यावरून जाताना मोठी वरात निघाली होती. सर्वजण ढोलताशाच्या तालावर नाचत होते. यावेळी फटाक्यांची मोठी माळ लावण्यात आली. या फटक्यांमुळे पुढे एवढे मोठे नुकसान होईल याची कोणालाही काहीच कल्पना नव्हती.

Aurangabad News
Aurangabad : राष्ट्रवादी युवकच्या जिल्हाध्यक्षावर हल्ला, प्रकृती चिंताजनक; नेमकं काय आहे प्रकरण?

सर्व गाव लग्नासाठी निघाला होता. मात्र फटाक्यांच्या काही ठिणग्या उसाच्या शेतात पडल्या आणि मोठा अनर्थ झाला. हातातोंडाशी आलेल्या दहा एकर उसाच्या शेताला आग लागली. यातील साडेचार एकरमधील ऊस जळून खाक झाला आहे. सदर घटनेत शेतकऱ्यांनी फटक्यांमुळेच आग लागल्याचे म्हटले आहे. गुरु सृष्टी लॉन मंगल कार्यालय येथे रविवारी लग्न सोहळा आयोजित केला होता. घडलेल्या घटनेने वधू आणि वर देखील चिंतेत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com