Petrol Diesel Price SaamTV
देश विदेश

Petrol Diesel : कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण सुरूच; इंधनाचे नवे दर जारी

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घट

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण सुरूच आहे. गेल्या 24 तासांत क्रूडच्या किमतीत आणखी घसरण झाली असून त्याचा परिणाम पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किरकोळ किमतींवरही झाला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी सोमवारी सकाळी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये यूपी-बिहारपासून हरियाणापर्यंत घसरण दिसून येत आहे. मात्र, आजही सरकारी तेल कंपन्यांनी दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चारही महानगरांमध्ये इंधनाच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. (Petrol Diesel Price Today)

सरकारी तेल कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, आज सकाळी गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात (नोएडा-ग्रेटर नोएडा) 1 पैशांनी वाढ झाल्यानंतर पेट्रोल 96.60 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.77 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. लखनऊमध्ये पेट्रोल 15 पैशांनी स्वस्त होऊन 96.42 रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहे, तर डिझेल 14 पैशांनी घसरून 89.62 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.

हरियाणाच्या गुरुग्राममध्येही आज पेट्रोल १३ पैशांनी स्वस्त होऊन ९६.९७ रुपये तर डिझेल १२ पैशांनी स्वस्त होऊन ८९.८४ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. बिहारची राजधानी पटनामध्ये पेट्रोलचा दर 32 पैशांनी घसरून 107.42 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 30 पैशांनी घसरून 94.21 रुपये प्रति लिटर झाला आहे.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– कोलकात्यात पेट्रोल 06.03 रुपये. डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल. BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात. 

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्टमधील PSI चं निधन; पोलिस दलात हळहळ

Banan Benefits: सकाळी रिकाम्या पोटी केळी खावी की नाही? जाणून घ्या हे ७ फायदे आणि परिणाम

Maharashtra News Live Update: वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून पोलीस कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Election Results : काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळला, बहुमत नसतानाही भाजपची सत्ता, क्रॉस व्होटिंगने पलटला सगळा खेळ

SBI Customers Alert: SBI ग्राहकांसाठी मोठी बातमी! सलग 5 दिवस बँकिंग सेवा ठप्प होणार

SCROLL FOR NEXT