Agra News Saam Tv
देश विदेश

Husband-wife Divorced : बायको म्हणतेय, नवरा सोडेन, पण मशेरी नाही! कंटाळलेल्या नवऱ्यानं लग्नानंतर ८ महिन्यांनीच मागितला घटस्फोट

Husband Wife Divorced News: आग्र्यात पती-पत्नीचं नातं घटस्फोटापर्यंत पोहोचलं आहे. या घटस्फोटाचं कारण देखील विचित्र आहे. बायकोची दात घासायचं मंजन नवऱ्याला पसंत नाही. त्यामुळं त्यांचं नातं घटस्फोटापर्यंत पोहोचलं आहे. या प्रकरणाबद्दल सविस्तर जाणून घेऊ या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Agra News

मशेरी हा अनेक बायकांच्या जिव्हाळ्याचं विषय आहे. बरेचजणांना मशेरीचं व्यसन असतं. पण कधी याच्यामुळे एखादा विषय टोकाला पोहोचलाय का? आग्र्यामध्ये या (Agra News) मशेरीमुळे पती पत्नीचं नातं थेट घटस्फोटापर्यंत पोहोचलं आहे. नक्की हे प्रकरण काय आहे, ते आपण सविस्तर जाणून घेऊ या. (Tajya Batmya)

उत्तर प्रदेशमधील आग्रा (Agra) येथील पती-पत्नीमधील भांडण सध्या खूप चर्चेत आलंय. या भांडणांचं कारण ऐकून तुम्हालाही मोठा धक्का बसेल. मशेरीचं सेवन हे पती-पत्नीच्या भांडणाचं कारण आहे. पत्नीला मशेरीचं व्यसन आहे. ती दिवसातून तीन-चारवेळा मशेरी लावते. त्यामुळं पती नाराज आहे. हे प्रकरण कुटुंब समुपदेशन केंद्रापर्यंत पोहोचलंय. याचा परिणाम असा झालाय की, बायको नवऱ्याला सोडायला तयार आहे, पण मशेरी सोडायला तयार नाही. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पत्नीबाबत पोलिसांत तक्रार

पतीने आरोप केलाय की, त्याची पत्नी दिवसातून एकदा नव्हे तर तीन-तीन वेळा तंबाखू असलेलं मंजन वापरते. नंतर इकडे तिकडे फिरत राहते. पतीने अनेकदा नकार दिल्यानंतरही पत्नीने त्याचं ऐकलं नाही. त्यानंतर दोघांमध्ये वाद (Husband Wife Divorced) सुरू झाला. त्यानंतर पतीने पत्नीला घराबाहेर काढलं. गेल्या 2 महिन्यांपासून ती तिच्या माहेरीच राहत होती. त्यांच्या नात्यात दुरावा आल्यानंतर हे प्रकरण कौटुंबिक समुपदेशन केंद्रापर्यंत पोहोचलं.

हे प्रकरण आग्रा येथील मंटोला पोलीस स्टेशन परिसरातील आहे. येथे राहणाऱ्या तरुणानं आपल्या पत्नीबाबत पोलिसांत तक्रार केली होती. तरुणाने सांगितलं की, 8 महिन्यांपूर्वी फतेहपूर सिक्री येथे राहणाऱ्या तरुणीशी त्याचं लग्न झालं होतं. त्यांच्या पत्नीला मशेरी लावायची आहे. त्यामुळे घरात वाद निर्माण होतात. त्याची पत्नी 2 महिन्यांपासून तिच्या माहेरच्या घरी राहत आहे. तिला अनेकदा फोन केला पण ती येत नाही, असं त्याने पोलिसांना सांगितलं होतं.

बायकोचा हट्टीपणा

मालपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या या तरुणीचं मंटोला पोलीस ठाणे हद्दीतील तरुणाशी लग्न झालं होतं. लग्नाच्या 8 महिन्यांनंतर त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. लग्नानंतर तिच्या नवऱ्याला तिच्या या सवयीबद्दल समजलं. त्यानंतर त्याने अनेकदा तिला मशेरी (Tobacco) लावण्यापासून रोखलं. त्यामुळं त्यांच्यात सातत्याने भांडणे होत होती.

पती-पत्नीमधील घरगुती वादामुळं पोलिसांनी हे प्रकरण कौटुंबिक समुपदेशन केंद्राकडे पाठवलं. ती वापरत असलेल्या मशेरीमध्ये तंबाखू असल्याचं महिलेला समजावून सांगण्यात आलं. त्याचं सेवन आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामुळे कर्करोगासारखे जीवघेणे आजार होऊ शकतात, असं सांगितलं गेलं. पण महिला काही ऐकायला तयार नव्हती. तिच्या या हट्टीपणाचं समुपदेशकांनाही आश्चर्य वाटलं. कौटुंबिक समुपदेशन केंद्राचे प्रभारी एसआय अपूर्व चौधरी यांनी दोघांनाही समुपदेशनाच्या पुढील तारखेला बोलावलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raanbhaji Recipe : पावसाळ्यात आवर्जून खा 'ही' रानभाजी; सर्व आजार जातील पळून, फायदे एकदा वाचाच

Maharashtra News Live Update: पुणे जिल्हा सत्र न्यायालयात आज नसरापूर प्रकरणाचा निकाल

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

High blood pressure: तरुण वयातच वाढतोय रक्तदाब? डॉक्टरांनी सांगितलं रोजच्या सवयींमधील सर्वात मोठं कारण

पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकरी आनंदी का होतो? |why farmers are happy after rain

SCROLL FOR NEXT