TMC Mahua Moitra Saam Tv
देश विदेश

TMC खासदार महुआ मोईत्रा पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारायची? भाजप खासदाराच्या आरोपाने खळबळ

TMC Mahua Moitra : गेल्या काही वर्षात महुआ मोइत्राने ह्या त्यांच्या आक्रमक स्वरामुळे एक फायरब्रँड नेत्या झाल्या आहेत.

Bharat Jadhav

Nishikant Dubey allegations on mp mahua moitra:

पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या अनेक नेते आणि मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. त्यात आता टीएमसीच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर आरोप झाले आहेत. मोईत्रा यांच्यावर भ्रष्टाचारासह संसदेची प्रतिष्ठा उल्लंघन केल्याचा आरोप भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी केलाय. (Latest News)

महुआ मोईत्रा यांनी पैसे आणि भेटवस्तूंच्या बदल्यात उद्योगपतीचे हितसंबंध जपण्यासाठी संसदेत प्रश्न करत होत्या. उद्योगपती दर्शन हिरानंदानी हे परदेशात स्थायिक आहेत. निशिकांत दुबे यांनी महुआ मोईत्रा यांची तक्रार लोकसभा अध्यक्षांकडे केलीय. दरम्यान हा एक अतिशय गंभीर आरोप आहे.

याआधी २००५ मध्ये अशाच एका प्रकरणात अनेक सदस्यांचे सदस्यत्व गमवावे लागले होते. या आरोपामुळे त्यांचे लोकसभेचे सदस्यत्व गेले आणि ते पुन्हा संसदेत जाऊ शकले नाहीत. गेल्या काही वर्षात महुआ मोइत्राने तिच्या आक्रमक स्वरामुळे एक फायरब्रँड नेत्या झाल्या आहेत. आता या फायरब्रँड नेत्याविरोधात लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार करण्यात आलीय. भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून तक्रार केलीय. महुआ यांनी संसदेत आतापर्यंत ६१ प्रश्न विचारले आहेत. त्यापैकी ५० प्रश्न उद्योगपतीच्या व्यवसायाशी संबंधित असल्याचा आरोप दुबे यांनी आपल्या पत्रात केला आहे.

निशिकांत यांनी लोकसभा अध्यक्षांना सांगितले की, जय अनंत देहादराई या दिल्लीस्थित वकिलांनी सखोल तपास केलाय. महुआने लोकसभेत विचारलेल्या प्रश्नांची लिंक जोडली आहे. त्यांनी विचारले प्रश्न एकाच उद्योगपतीशी कसे संबंधित होते हेही दुबे यांनी सांगितले आहे. एक मनोरंजक गोष्ट म्हणजे काही प्रश्न अदानी समूहाशी जोडलेले होते. तर महुआ यांचे उद्योगपती मित्र हिरानंदानी हे अदानी समूहाचे प्रतिस्पर्धी आहेत.

या प्रकरणांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी निशिकांत दुबे यांनी केलीय. ज्या खासदार यांनी त्यांची प्रतिमा फायरब्रँड नेत्या म्हणून केली त्यांचं खरं रुप पैसे घेऊन प्रश्न विचारणाऱ्याचं निघालं, असा आरोप दुबे यांनी केलाय. हा केवळ संसदेचा अवमान आणि विशेषाधिकाराचा भंग नाही तर दंड संहितेच्या १२०A अंतर्गत गुन्हा देखील असल्याचं दुबे म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: Mumbai: रायगडच्या खालापुरमध्ये लागल्या वाहनांच्या रांगा

रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; सुनील तटकरेंच्या समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश

तटकरे जन्माला आले तेव्हाच...; शिंदेसेनेच्या आमदाराची जीभ घसरली, काय म्हणाले? पाहा व्हिडिओ

Natural Plants : घरात डास, माश्या आणि मुंग्यांचा त्रास होतोय? लावा ही ५ रोपे आणि कीटकांना ठेवा दूर

उत्तर प्रदेशसह 5 राज्यांच्या निवडणुका कधी होणार? तारखांबाबत मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT