Electric Bus
Electric Bus Saam Tv
देश विदेश

Electric Bus: तिरूपतीच्या देवाला चक्क इलेक्ट्रिक बसेस भेट! मंदिर परिसरात भाविकांसाठी पर्यावरण पुरक वाहतुकीची सोय

साम टिव्ही ब्युरो

तिरुपती : तिरुपतीला दक्षिणा देण्याच्या प्रथेच्या अनेक कहाण्या तुम्ही वाचल्या असतील. पण आता तिरूपतीच्या देवाला चक्क इलेक्ट्रिक बसेस (Electric Buses)भेट म्हणून मिळाल्या आहेत. मेघा इंजिनीअरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड अर्थात एमईआयएल या कंपनीची उपकंपनी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडने तिरुमाला तिरुपती देवस्थानाला (TTD) 10 इलेक्ट्रिक बसेस भेट स्वरुपात दिल्या आहेत.

तिरुमला घाट हा पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील प्रदेश आहे. डिझेल इंधन न वापरता इलेक्ट्रिक बसेसचा वापर केल्याने कार्बन उत्सर्जन घट होण्यास तसेच इंधनाच्या खर्चात कपात होण्यास मदत होईल. TTD ट्रस्टने या देणगी बद्दल MEIL चे आभार मानले. (Latest Marathi News)

ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक के.व्ही. प्रदीप याप्रसंगी तिरुमला येथे उपस्थित होते. स्वच्छ आणि पर्यावरणपूरक 9-मीटर- प्रकारातल्या या 10 ई-बस डोंगराच्या वरच्या भागातल्या मंदिर परिसरात भाविकांची वाहतूक करतील. या ई-बससाठी चार्जर स्टेशन्स उभारले असल्याचे त्यांनी सांगीतले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : राहुल गांधी यांच्या पुण्यातील सभेच्या वेळेत बदल, सभास्थळी ६.३० वाजता येणार

Share Market Today : शेअर बाजारात मोठी पडझड; सेन्सेक्स १४०० अंकानी घसरला, झटक्यात गुंतवणूकदारांचे ३ कोटी बुडाले

Godrej Family Tree : गोदरेज समुहात विभाजन, आता कोण सांभाळणार व्यवसाय? वाटणीत कोणाला काय मिळालं?

Amit Shah: उद्धव ठाकरे नकली सेनेचे अध्यक्ष, बाळासाहेबांचे नाव घेऊ नये; अमित शहांची टीका

Sanjana Sanghi: संजनाच्या सौंदर्याचा जलवा; हटके लूकने वेधले लक्ष

SCROLL FOR NEXT