Tirupati Laddoos 
देश विदेश

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

Tirupati Laddoos: तिरुपती मंदिराच्या प्रसादात माशाचे तेल सापडल्याचे समोर आले आहे. नमुना तपासणीत ही बाब समोर आली आहे. जगनराजच्या काळात तिरुपती मंदिराच्या प्रसादात तुपाऐवजी प्राण्यांची चरबी मिसळली जात होती, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्यावर केला होता.

Bharat Jadhav

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी माजी मुख्यमंत्र्यांवर खळबळजनक आरोप केलाय. YSR काँग्रेसचे जगनमोहन रेड्डी यांचं सरकार असताना बालाजी मंदिरातील लाडूमध्ये तूपा ऐवजी जनावरांची चरबी वापरली. असा गंभीर आरोप चंद्राबाबू नायडू यांनी केला. चंद्राबाबू नायडू यांच्या या दाव्याने आंध्र प्रदेशात मोठी खळबळ माजलीये. टीडीपीचे प्रवक्ते अनाम वेंकटा रमण्णा यांनी याबाबत गुजरात डेअरीचा अहवालही सोशल मीडियात शेअर केलाय.

जगप्रसिद्ध असलेल्या तिरुपती लाडू तयार करताना निकृष्ट घटक आणि प्राण्यांची चरबी वापरल्याचा आरोप मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी केला होता. गुजरातमधील पशुधन प्रयोगशाळेने भेसळीची पुष्टी केल्याचं मुख्यमंत्री नायडू यांनी सांगितलं. दरम्यान टीडीपीचे प्रवक्ते अनम वेंकट रमणा रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत कथित प्रयोगशाळेचा अहवाल दाखवलाय. ज्याने दिलेल्या तुपाच्या नमुन्यात "बीफ टॅलो" असल्याचं यात म्हटलंय.

हाती आलेल्या रिपोर्टनुसार, लार्ड म्हणजेच डुकराची चरबी आणि माशांचे तेल लाडू बनवण्यासाठी वापरलं जात होतं. या प्रयोगशाळेचा रिपोर्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या रिपोर्टनुसार, नमुना पाठवण्याची तारीख ९ जुलै २०२४ होती आणि प्रयोगशाळेच्या अहवालाची तारीख १६ जुलै होती.

टीडीपीचे प्रवक्ते अनम वेंकट रमण रेड्डी यांनी म्हणाले की, नमुन्यांच्या प्रयोगशाळेतील अहवालांनी हे स्पष्ट होतं की, तिरुमलाला पुरवले जाणाऱ्या तूप तयार करण्यासाठी प्राण्यांची चरबी आणि प्राण्यांची चरबी वापरली जाते. खाण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या डुकराची चरबी आणि माशांचे तेल देखील यात वापरले जात होते.

तिरुपती मंदिरात अर्पण केल्या जाणाऱ्या तुपात प्राण्यांची चरबी मिसळल्याचा आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला होता. सीएम चंद्राबाबू नायडू यांच्या आरोपानंतर आणि विश्व हिंदू परिषदेने (व्हीएचपी) गुरुवारी या प्रकरणाशी संबंधित असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Budhaditya Rajyog: बुध ग्रहाच्या राशीत बनणार बुधादित्य राजयोग; 'या' राशींना गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळणार

SCROLL FOR NEXT