Tirupati Balaji Mandir  Saam Tv
देश विदेश

Tirupati Balaji Mandir : तिरुपती मंदिरात गैर-हिंदूंना काम करता येणार नाही, १८ कर्मचाऱ्यांची हकालपट्टी

Tirupati Balaji Mandir Trust : मंदिराचे पावित्र्य टिकून राहावे यासाठी तिरुमाला तिरुपती देवस्थानच्या ट्रस्टने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे बालाजी मंदिरातील गैर-हिंदू कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.

Yash Shirke

Tirupati Balaji Mandir : तिरुमाला तिरुपती देवस्थानाच्या ट्रस्ट बोर्डने १८ नोव्हेंबर २०२४ रोजी एका बैठकीमध्ये श्री बालाजी मंदिरामधून गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. यानुसार मंदिरातील १८ गैर-हिंदू कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

बोर्डाने मंदिराची अध्यात्मिक पावित्र्य टिकून राहावे यासाठी टीटीडी म्हणजेच तिरुमाला तिरुपती देवस्थानचे अध्यक्ष बी आर नायडू यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात झालेल्या बैठकीमध्ये गैर हिंदू कर्मचाऱ्यांना मंदिर प्रशासनाने ट्रान्सफर घेण्याचा किंवा स्वेच्छानिवृत्ती घेण्याचा पर्याय दिला होता. मंदिराच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये गैर-हिंदूंना सामील करु नये यासाठी आतापासूनच कडक नियम करायला हवेत असे ट्रस्टचे मत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आंध्रप्रदेशमध्ये जेव्हा जगन मोहन रेड्डी यांच्याकडे सत्ता होती, त्या वेळेस अनेक शासकीय कार्यालयांसह बालाजी मंदिरामध्येही गैर-हिंदू कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. सध्या तेथे चंद्राबाबू नायडू यांचे सरकार आहे. त्यांच्याकडे सत्ता आल्यापासून गैर-हिंदू कर्मचाऱ्यांची भरती हा वादाच विषय ठरला आहे. या भरतीवर आक्षेप घेत मंदिर ट्रस्टने देखील चिंता व्यक्त केली आहे.

देवस्थानाच्या ट्रस्ट बोर्डचे अध्यक्ष बी आर नायडू यासंदर्भात आदेश जाहीर केला आहे. या आदेशानुसार गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना मंदिरातील उत्सव, मिरणवूका आणि अन्य कार्याक्रमामध्ये सहभागी राहता येणार नाही. धर्मांतरणाबाबत चिंता व्यक्त करत नायडू यांनी मंदिरातील कामे फक्त हिंदू कर्मचारी करतील यावर भर दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: गोरेगाव आरे कॉलनी परिसरात मोठा अपघात

Vidarbha : वेगळ्या विदर्भाची मागणीने राजकारण तापले, नेमकं काय म्हणाले ? पाहा व्हिडिओ

३ हजारांत तरूणीचा सौदा; द ताज पेइंग गेस्ट हाऊसमध्ये सेxxx रॅकेटचा अड्डा, 'असा' उघडा पडला आरोपींचा डाव

महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडले, विरोधी पक्षनेताच नाही

Shocking : ठाणे हादरलं! कोर्टाजवळ कारमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, गुंगीचे औषध देऊन नको ते केलं

SCROLL FOR NEXT