Tirumala Tirupati Devasthanam x
देश विदेश

Video : तिरुपती मंदिरात १०० कोटींच्या चोरी प्रकरणात खळबळजनक खुलासा, CCTV फुटेजमध्ये चोरी करताना दिसला अधिकारी

Tirumala Tirupati Devasthanam : तिरुमला तिरुपती बालाजी मंदिरात झालेल्या कोट्यावधींच्या चोरीच्या प्रकरणाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. या चोरीशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

Yash Shirke

  • तिरुपती बालाजी मंदिरातून १०० कोटींच्या चोरीचा खुलासा.

  • सीसीटीव्ही फुटेजमध्ये अधिकारी चोरी करताना कैद.

  • भानु प्रकाश रेड्डींच्या आरोपामुळे प्रकरणात खळबळ.

CCTV Video : आंध्रप्रदेशच्या तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) येथील कोट्यवधी रुपयांच्या चोरीचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. राज्यामध्ये वायएसआरसीपीची सत्ता असताना तिरुमला स्वामींच्या परकामणीतून १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम चोरीला गेली होती, असा आरोप टीटीडी बोर्डाचे सदस्य भानु प्रकाश रेड्डी यांनी केला आहे.

आज तकने दिलेल्या माहितीनुसार, तिरुमला तिरुपती देवस्थानम हे देशातील सर्वात लोकप्रिय देवस्थानांपैकी एक आहे. या मंदिरामध्ये १०० कोटींपेक्षा जास्त रक्कम चोरी झाल्याचे देवस्थानाच्या बोर्डाचे सदस्य भानु प्रकाश रेड्डी यांनी केला आहे. त्यांनी या घोटाळ्याचे वर्णन टीटीडीच्या इतिहासातील सर्वात मोठी चोरी असे केले आहे. या संदर्भामध्ये भानु प्रकाश रेड्डी यांनी सीसीटीव्ही फुटेज देखील जारी केले आहे.

भानु प्रकाश रेड्डी यांनी सादर केलेल्या व्हिडीओमध्ये रवी कुमार नावाचा एक व्यक्ती परकामणीतून चोरी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याने हे पैसे रिअर इस्टेटमध्ये गुंतवले होते, घोटाळ्यानंतर महत्त्वाचे पुरावे नष्ट केले असा आरोप भानु प्रकाश रेड्डी यांनी केला आहे. त्यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

घोटाळ्यामध्ये वायएसआरसीपीचे अनेक नेते, वरिष्ठ अधिकारी आणि एक वरिष्ठ पोलीस अधिकारी सहभागी असल्याचा आरोप भानु प्रकाश रेड्डी यांनी केला आहे. चोरीच्या पैशांमधील एक भाग ताडेपल्ली येथील राजवाड्यात नेण्यात आला होता. उच्च न्यायालयाने हे प्रकरण सीआयडीकडे सोपवले असून एका महिन्याच्या आत सीलबंद अहवाल मागितला आहे, असे रेड्डी यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: कर्जतमध्ये अजितदादांचा डाव; भाजप, शिवसेनेला मोठा धक्का; दोन्ही पक्षातील पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Ladki Bahin Yojana : लाखो लाडकींची नावे का वगळली? महत्वाचं कारण आलं समोर

Crime News : वाईन मार्टचे मालक आणि मॅनेजरवर जीवघेणा हल्ला; नांदेडमध्ये खळबळ

Dhangar Protest: ...तर फसवणाऱ्यांची घरं जाळा, सरकार खबरदार नसेल तर नेपाळमध्ये झालं त्या पलीकडे घडवा, या धनगर नेत्याचं चिथावणीखोर वक्तव्य

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचा तरुणाला मोठा फटका; एच १ बी व्हिसा नियम बदलताच लग्न मोडलं

SCROLL FOR NEXT