Tihar Jail clash Between Two Groups Of Prisoners 15 Injured
Tihar Jail clash Between Two Groups Of Prisoners 15 Injured Saam Tv
देश विदेश

तिहार तुरुंगात कैद्यांच्या दोन गटांत तुफान राडा; धक्कादायक कारण आलं समोर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली : देशातील सर्वात सुरक्षित तुरूंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिहार तुरुंगात एक धक्कादायक घटना घडली आहे. तिहार तुरुंगात (Tihar Jail) पुन्हा एकदा कैद्यांच्या दोन गटांत हिंसक हाणामारी (Fighting) झाली. या हाणामारीत जवळपास १५ कैदी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्राथामिक माहितीनुसार, तुरूंगातील कैद्यांमधील (prisoners) वर्चस्वाच्या लढाईतून हा प्रकार घडला आहे. (Tihar Jail clash Between Two Groups Of Prisoners 15 Injured)

हे देखील पाहा -

तिहार तुरुंग प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, कैद्यांच्या दोन गटांत दोन दिवसांपूर्वी हाणामारी झाली. यामध्ये कारागृह क्रमांक ८ आणि ९ मधील कैदी आपसांत भिडले. त्यानंतर त्यांच्यात हिंसक हाणामारी झाली आणि या हाणामारीत १५ कैदी जखमी झाले.

दरम्यान, हिंसाचारात जखमी झालेल्या १५ कैद्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यातील काही कैद्यांना प्राथामिक उपचारानंतर पुन्हा कारागृहात नेण्यात आलं. उर्वरित जखमी कैद्यांवर रुग्णालयात अजूनही उपचार सुरू आहेत. तिहार तुरूंगातील हिंसाचाराची ही घटना समोर येताच, या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश तुरुंग प्रशासनाने दिले आहेत.

यापूर्वीही भिडले होते कैदी

तिहार तुरूंगात कैद्यांमध्ये हाणामारी झाल्याची ही काही पहिलीच घटना नाही. या अगोदर सुद्धा इथे अशा प्रकारच्या हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. फेब्रुवारीत तिहारमध्ये कैद्यांचे दोन गट आपसांत भिडले होते. त्यावेळी ४ कैदी गंभीर जखमी झाले होते. इतकंच नाही तर, या कैद्यांचे भांडण सोडवण्यासाठी गेलेले कारागृहाचे सहायक अधीक्षकही जखमी झाले होते.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News : जेव्हीएलआर मार्गावरील वाहतुकीत ३१ मे पर्यंत बदल, नेमकं काय आहे कारण?

LSG vs KKR : कोलकाताकडून लखनऊचा दारूण पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

Canada Import from India : कॅनडा भारताकडून काय मागवतो

Uddhav Thackeray: मोदींचं PM पदासाठी नाव सुचवलं हे माझं पाप, उद्धव ठाकरे यांनी भरसभेत व्यक्त केली खंत

Mumbai Local : तीन प्रवाशांच्या मृत्यूनंतर मध्य रेल्वेला आली जाग; लोकलच्या गर्दी नियंत्रणासाठी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT