Viral Video Saam TV
देश विदेश

Viral Video : पतीसोबत भांडायला कारमधून उतरली; तितक्यात वाघाने झडप घातली अन्... ; पुढे काय घडलं पाहा VIDEO

Viral Video : कारमधून खाली उतरताच वाघाने महिलेची शिकार केलीये.

Ruchika Jadhav

Tiger Viral Video : मृत्यू कधी कसा ओढावेल याचा काही अंदाज नाही. माणसाने नेहमीच अती शहानपना करू नये असं म्हणतात. मात्र आपल्या पतीशी झालेलं भांडण एका महिलेच्या जीवावर बेतलं आहे. कारमधून खाली उतरताच वाघाने महिलेची शिकार केलीये. (Viral Video)

सदर घटना रस्त्यावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, रस्त्याच्या दुतर्फा जंगल आहे. या जंगलाच्या मधून रस्त्यावर काही वाहने चालली आहेत. अशात एक कार अचानक रस्त्याच्या मधोमध थांबते. रागारागात एक महिला कारमधून बाहेर येते.

या महिलेचे तिच्या पतीशी भांडण झाले असावे असं वाटत आहे. कारण उजव्या बाजूने उतरून महिला डाव्या बाजूस बसण्यासाठी येत असते. कार चालवण्यावरून तिच्यात आणि तिच्या पतीत वाद झाला असावा. महिला दुसऱ्या दरवाजा जवळ येऊन उभी राहते. त्यावेळी तिचा पती तिला आतमध्ये बसण्यास सांगत असतो.

मात्र तिला राग आल्याने ती पटकन आतमध्ये बसत नाही. आता ही सर्व घटना वाघ लपून पाहत असतो. महिला जशी दुसऱ्या दरवाजा जवळ येऊन उभी राहते तसा वाघ तिच्यावर झडप घालतो. वाघ (Tiger) आपल्या जबड्यात महीलेचा हात धरून तिला थेट जंगलात खेचून घेऊन जातो. आपल्या पत्नीला वाघाने नेल्याचं पाहून पती देखील घाबरून जातो. तो तिला सोडवण्यासाठी वाघाच्या मागे पळतो. तसेच कारमध्ये असलेली आणखी एक व्यक्ती देखील त्याच्या मागे पळतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS: दुष्काळात तेरावा महिना...सराव सामन्यात संघातील प्रमुख फलंदाज दुखापतग्रस्त

Maharashtra News Live Updates: एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी दौऱ्यावर, तीन सभा घेणार

Maharashtra Election : नाकाबंदी सुरू होती, कारमध्ये सापडलं घबाड, जळगावात २० लाख कॅश पकडली, आतापर्यंत ४ कोटी जप्त

Bigg Boss 18: सलमानच्या बिग बॉसमध्ये लागणार तडका; किम कार्दशियन घेणार वाइल्डकार्ड एन्ट्री?

VIDEO : आमदार शहाजी बापू पटलांचं मतदारांना भावनिक आवाहन; म्हणाले... | Marathi News

SCROLL FOR NEXT