Three students die in water tank  Saam Tv
देश विदेश

Shocking News: शाळेत खेळता खेळता पाण्याच्या टाकीत पडून तीन विद्यार्थिनींचा मृत्यू

Three Students Die In Water Wank:राजस्थान येथील बीकानेर जिल्ह्यात नोखा तालुक्यात असलेले देवनाडा गावातील एका सरकारी शाळेत मंगळवारी खेळता खेळता तीन मुलींचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Saam Tv

बीकानेर (राजस्थान): बीकानेर जिल्ह्यातील नोखा तालुक्यात असलेल्या देवनाडा गावातील सरकारी शाळेत मंगळवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास तीन मुली शाळेत खेळत असताना पाण्याच्या टाकीत पडल्या. यावेळी त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण तीनही मुली या पाण्यात पूर्णपणे बुडाल्या होत्या त्यामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.

शाळेत 8 वर्षाची प्रज्ञा, 9 वर्षाची भारती आणि 8 वर्षाची रवीना आपल्या शाळेतल्या मैत्रिणींसोबत खेळत होते. खेळता खेळता या तिघी पाण्याच्या टाकीवर चढल्या. अचानक पाण्याच्या टाकीवरचे पत्रे तुटले आणि या मुली पाण्यात पडल्या आणि तीनही मुली 8 फुट खोलवर पाण्यात पडल्या. घटना घडताच आजू बाजूला गोंधळ उडाला आणि ग्रामस्थानी तात्काळ ट्रॅक्टर मागवले आणि मोटर देखील मागवल्या.

टाकीतील पाणी काढण्यासाठी गावकऱ्यांनी ट्रॅक्टर आणि मोटर मागवून अथक प्रयत्न केले. अर्ध्या तासानंतर पाणी काढून टाकीत उतरण्यात आले, मात्र तोपर्यंत तीनही मुलींचा मृत्यू झाला होता. त्यांना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या दुर्घटनेनंतर शाळेतील सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित असून, शाळेच्या मुख्याध्यापकांनी डिसेंबर 2024 मध्येच शिक्षण अधिकाऱ्यांना टाकीची अवस्था ही खराब झाली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते की टाकी पूर्णपणे खराब झाली असून ती केव्हाही कोसळू शकते. मात्र, योग्य वेळी दुरुस्ती न झाल्याने या निष्पाप विद्यार्थिनींना जीव गमवावा लागला.

या घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शाळेच्या मुख्याध्यापक आणि एका शिक्षकाला निलंबित केले आहे. तसेच, मृत मुलींच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपयांची नुकसानभरपाई आणि कंत्राटी नोकरी देण्याची मागणी केली जात आहे. गावकऱ्यांनी रुग्णालयाबाहेर तीव्र आंदोलन छेडले आहे. प्रशासनाने याप्रकरणी कडक कारवाई करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी लाऊन धरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जमिनीचे तुकडे मंजुरीशिवाय विकता येणार नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय

Hardik Pandya: मुंबई इंडियन्स आणि हार्दिक पंड्यामध्ये बिनसलं? काय आहे नेमकं सत्य, वाचा

पेट्रोल-डिझेलची बचत करा, सोनं खरेदी करू नका; मोदींच्या आवाहनावर महाराष्ट्राचा कौल काय? मुंबई-पुण्यासह, नागपूरकरांची भूमिका स्पष्ट

Shani Jayanti 2026: शनी जयंतीला होणार बुध-शुक्राचं गोचर; या राशींना मिळणार पैसाच पैसा

मुलीच्या हळदीत वडिलाचं हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू; लग्न घरावर कोसळला दुःखाचा डोंगर

SCROLL FOR NEXT