Lawrence River Saam TV
देश विदेश

Canada-US Border: गुजरातमधील एकाच कुटुंबातील तिघांचा बुडून मृत्यू, कॅनडातून अमेरिकेत जाताना दुर्घटना

Canada-US Border: कॅनडातून अमेरिकेते बेकायदेशीर प्रवेश करताना सेंट लॉरेन्स नदीत ही घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Canada-US Border: अमेरिका आणि कॅनडा बॉर्डरवर आठ जणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. मृतांमध्ये तीन भारतीयांचा समावेश आहे. कॅनडातून अमेरिकेते बेकायदेशीर प्रवेश करताना सेंट लॉरेन्स नदीत ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातच्या मेहसाना जिल्ह्यातील मानेकपुरामधील चौधरी कुटुंब बोटीतून सेंट लॉरेन्स नदी मार्गाने कॅनडातून अमेरिकेत शिरण्याच्या प्रयत्नात होतं. चौधरी कुंबियांसह एक रोमानियन कुटुंबही बोटीमध्ये होतं. मात्र नदी ओलांडत असताना त्यांची बोट उलटली. बोटीतील सर्वांना या अपघातात जीव गमवावा लागला आहे. (Latast Marathi News)

या बोट अपघतात वडिलांसह दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये प्रवीण वेलजीभाई चौधरी (वय 50 वर्ष), मुलगी विधि प्रवीणभाई चौधरी (23 वर्ष) आणि मुलगा मीत प्रवीणभाई चौधरी (20 वर्ष) यांचा समावेश आहे. घटनेची माहिती समोर आल्यानंतर गावात शोककळा पसरली.

दोन्ही कुटुंब ज्या बोटने प्रवास करत होते ती बोट लहान होती. बोटीत क्षमतेपेक्षा जास्त जण बसले होते. दरम्यान जोरदार वारा आणि खराब हवामानामुळे ही बोट उलटली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa T20 WC: दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर टीम इंडियाच्या फलंदाजांनी नांगी टाकली; 111 धावांवर अख्खा संघ All Out

Monday Horoscope : थकवा, चिडचिड आणि शब्दांवर नियंत्रण ठेवा; ५ राशींच्या लोकांनी वाणीवर संयम ठेवा,अन्यथा...

बाजारातून घरी परतताना काळाचा घाला, ५ मजुरांचा जागीच मृत्यू; अपघाताचं कारण आलं समोर

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना आता १५०० नाहीतर २१०० रुपये मिळणार; अर्थसंकल्पीय अधिवेशनात होणार घोषणा?

55 वर्षांचा विरह, रक्ताची नाती पुन्हा एकत्र, 55 वर्षांनंतर भेटीची कहाणी, दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी

SCROLL FOR NEXT