AAP MLAs Join BJP 
देश विदेश

मोठी बातमी! भाजपची ताकद वाढली, ३ आमदारांनी केला पक्षप्रवेश; राजकीय वर्तुळात खळबळ

Punjab Assembly Election 2027 : पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पार्टीला मोठा राजकीय धक्का बसला आहे. हरमीत सिंग पठाणमाजरा, चेतन सिंग जौरामजरा आणि कुंवर विजय प्रताप सिंग या तीन आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

Namdeo Kumbhar

Punjab AAP MLAs latest news : पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवाल यांच्या आप पार्टीला राजकीय धक्का बसला आहे. पक्षाच्या ३ बंडखोर आमदारांनी 'आप'च्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर थेट नवी दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयाबाहेर 'भाजप जिंदाबाद'च्या घोषणा दिल्या आहेत. त्यांनी आज अधिकृरित्या भाजपमध्ये प्रवेश केला.

भगवंत मान सरकार ड्रग्सचा विळखा आणि वाढत्या कर्जासारखे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करत या आमदारांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर पंजाबच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. २०२७ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हरमीत सिंग पठाणमाजरा, चेतन सिंग जौरामजरा आणि कुंवर विजय प्रताप सिंग यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला.

औपचारिक पक्षप्रवेशासाठी तिन्ही आमदार दिल्लीतील भाजप मुख्यालयात आज सकाळी दाखल झाले. एएनआय या वृत्तसंस्थेने शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये पठाणमाजरा आणि जौरामजरा पक्षाच्या कार्यालयात 'भाजप जिंदाबाद'च्या घोषणा देताना दिसत आहेत. रविवारी पठाणमाजरा आणि जौरामजरा यांनी 'आप'च्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. तर आपचे निलंबित आमदार आणि माजी आयपीएस अधिकारी कुंवर विजय प्रताप सिंह यांनी सोमवारी भाजपमध्ये सामील होण्यापूर्वी पंजाब विधानसभेचा राजीनामा दिला. त्यानंतर तिन्ही आमदारांनी आज भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला.

अमृतसर उत्तरचे प्रतिनिधित्व करणारे कुंवर विजय प्रताप सिंह, समानाचे चेतन सिंह जौरामजरा आणि पंजाबच्या पतियाळा जिल्ह्यातील सानौरचे हरमीत सिंह पठाणमाजरा हे तीन नेते आहेत. दरम्यान, आपने शनिवारी ४० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यात धुरीमधून मुख्यमंत्री भगवंत मान, कोट कपूरामधून विधानसभा अध्यक्ष कुलतार सिंग संधवान आणि पश्चिम लुधियानामधून तुरुंगवासी मंत्री संजीव अरोरा यांचा समावेश आहे. पहिल्या उमेदवारीच्या यादीत तिन्ही नेत्याचा समावेश नव्हता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पावसामुळे रत्नागिरीत उडाली भातशेतीची दाणादाण, शेतकऱ्याचं मोठं नुकसान

Dia Mirza : सेलिब्रेटी कॅम्पेनवरून वाद! अमित साटम यांनी अभिनेत्रीला सुनावले खडेबोल; BMC ने डिलीट केला व्हिडीओ

Ranbir Kapoor Ramayana: 'कुछ तो लोग कहेंगे...'; 'रामायण' चित्रपटावरुन ट्रोल करणाऱ्यांना रणबीर कपूरने दिलं सडेतोड उत्तर

Poor Circulation Symptoms: पायांवरचे केस अचानक गळतायत? शरीर देत असलेल्या 'या' गंभीर आजाराचे संकेत वेळीच ओळखा!

Sprouts Benefits : रोज एक मूठभर स्प्राउट्स खाल्ल्याने काय होते? जाणून घ्या त्याचे आरोग्यदायी फायदे

SCROLL FOR NEXT