Mixer Cleaning Tips : मिक्सरच्या ब्लेडमध्ये अन्न अडकतंय? वापरा 'या' ५ सोप्या टिप्स, झटपट होईल स्वच्छ

Shreya Maskar

मिक्सरमध्ये अडकलेले अन्न

मिक्सरमध्ये चटणी, मसाले किंवा इतर पदार्थ वाटल्यानंतर भांड्याच्या तळाशी आणि ब्लेडजवळ अन्न अडकते. हे अन्न काढताना अनेकदा त्रास होतो. चमच्याने किंवा हाताने काढण्याचा प्रयत्न केल्यास ब्लेडमुळे दुखापत होण्याची शक्यता असते. अशावेळी काही सोप्या किचन टिप्स वापरून मिक्सर स्वच्छ करता येतो.

Food stuck in mixer | pinterest

कोमट पाणी वापरा

मिक्सरच्या भांड्यात थोडे कोमट पाणी घाला. काही मिनिटे तसेच ठेवा. त्यामुळे भांड्याला चिकटलेले अन्न मऊ होऊन सहज निघण्यास मदत होते.

Use lukewarm water | pinterest

डिशवॉश लिक्विडचा वापर

मिक्सरच्या भांड्यात पाणी आणि काही थेंब डिशवॉश लिक्विड घाला. झाकण लावून मिक्सर काही सेकंद चालवा. त्यानंतर भांडे स्वच्छ पाण्याने धुवा.

Use of dishwashing liquid | pinterest

भांडे हलकेच फिरवून घ्या

भांड्यात कोमट पाणी घालून ते हलकेच गोलाकार फिरवा. यामुळे भिंतींना चिकटलेले अन्न सुटण्यास मदत होते. विशेषतः चटणी किंवा मसाल्याचे अवशेष काढण्यासाठी ही पद्धत उपयोगी ठरते.

Mixer Grinder | google

मऊ ब्रश वापरा

भांडे मिक्सरच्या बेसपासून वेगळे करा. मऊ ब्रश किंवा बाटली स्वच्छ करण्याच्या ब्रशने अन्नाचे अवशेष काढा. ब्लेडच्या आसपास स्वच्छता करताना हात थेट ब्लेडजवळ नेऊ नका.

Use a soft brush | pinterest

सिलिकॉन स्पॅचुलाचा वापर

भांड्याच्या आतील बाजूला चिकटलेले अन्न काढण्यासाठी सिलिकॉन स्पॅचुला वापरा. यामुळे भांड्याच्या पृष्ठभागावर ओरखडे पडण्याची शक्यता कमी होते. ब्लेडजवळ स्पॅचुला वापरताना काळजी घ्या.

spatula | freepik

मिक्सरचे झाकण स्वच्छ करा

झाकण आणि त्यातील रबर गॅस्केट वेगळे करता येत असल्यास उत्पादकाच्या सूचनेनुसार वेगळे करा. त्यावरील अन्नाचे अवशेष ब्रशने स्वच्छ करा. धुतल्यानंतर सर्व भाग पूर्णपणे वाळवून पुन्हा व्यवस्थित बसवा.

Clean the lid of the mixer | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Note | pinterest

NEXT : रात्री सारखे सारखे झोपेतून जागे होताय? असू शकतात 'ही' ५ कारणे

Sleep Problems | AI PHOTO
येथे क्लिक करा...