Threat of tej cyclone IMD predicts heavy rains in Tamil Nadu Kerala Delhi Maharashtra Weather Updates Saam TV
देश विदेश

Rain Alert: तेज चक्रीवादळ विक्राळ रुप धारण करणार; या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस कोळणार; IMD कडून अलर्ट जारी

IMD Rain Alert: मध्य बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचं चक्रीवादळात रुपांतर झालं आहे. त्यामुळे काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

Satish Daud

Weather Updates Today

देशाच्या काही भागातून मान्सूनने माघार घेतली असली, तरी अद्यापही काही राज्यांमधून मान्सून पूर्णत: माघारी परतलेला नाही. केरळ आणि तामिळनाडूमध्ये पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. त्यातच मध्य बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचं चक्रीवादळात रुपांतर झालं आहे. या चक्रीवादळाला तेज असं नाव देण्यात आलं आहे. (Latest Marathi News)

पुढील २४ तासांत हे चक्रीवादळ आक्राळ-विक्राळ रुप धारण करु शकतं. त्यामुळे काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान खात्याने (Weather Updates) दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तेज चक्रीवादळ रविवारी दुपारनंतर अतिशय तीव्र होईल.

यामुळे दक्षिण-पश्चिम अरबी समुद्रावर 125-135 किमी प्रतितास वेगाने वादळी वाऱ्याचा वेग वाहण्याची शक्यता आहे. या वाऱ्यांचा वेग 150 किमीपर्यंत वाढू शकतो. परिणामी आज केरळ, तामिळनाडूमध्ये ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस (Rain Alert) पडण्याची शक्यता आहे. तर जम्मू आणि काश्मीर, लडाख, पंजाब, पश्चिम राजस्थान आणि पुद्दुचेरी मध्येही पावसाचा अंदाज आहे.

दरम्यान, चक्रीवादळामुळे भारतीय तटरक्षक दलाने आंध्र आणि तामिळनाडू किनारपट्टीवर काम करणाऱ्या मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच जे मच्छिमार समुद्रात गेले आहेत. त्यांना तातडीने माघारी फिरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

येत्या 25 ऑक्टोबरपर्यंत मच्छिमारांनी दक्षिण-पश्चिम अरबी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असं आवाहन देखील करण्यात आलं आहे. दरम्यान, भारतीय तटरक्षक दलाने चेन्नई, आंध्र आणि तामिळनाडू किनारपट्टी भागत अनेक जहाजे तैनात केली आहेत. तेज चक्रीवादळाचा महाराष्ट्र आणि गुजरात किनारपट्टीला सध्या कोणताही धोका नसल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भीमाशंकरची महादेव नगरी सजली, भाविक शिवभक्तीत तल्लीन

Gaza News Today : गाझात उपासमारीने 124 जणांचा मृत्यू; 50 ग्रॅमचं बिस्किट 750 रुपयांना, VIDEO

Monday Horoscope : गणरायाची कृपा होणार,अचानक मोठा पैसा मिळवाल; ५ राशींचे लोक ठरणार भाग्यवान, वाचा राशीभविष्य

श्रावण सोमवारी पहाटे दुर्घटना, मंदिरात विजेची तार तुटल्याने चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू, 38 भाविक जखमी

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

SCROLL FOR NEXT