HDFC Bank Saam Tv
देश विदेश

HDFC बॅंकेचे १०० ग्राहक झाले मालामाल, १३ कोटी रुपयांचा मेसेज आला, पण...

तामिळनाडूत एचडीएफसी बॅंकेने शंभरहून अधिक ग्राहकांना एका दिवसासाठी मालामाल केले.

नरेश शेंडे

चेन्नई : तामिळनाडूत (Tamilnadu) एचडीएफसी बॅंकेने (HDFC Bank) शंभरहून अधिक ग्राहकांना एका दिवसासाठी मालामाल केले. रविवारी बॅंकेने ग्राहकांच्या खात्यात १३ कोटी रुपये जमा केले. याबाबत ग्राहकांना कळताच त्यांच्या आनंदाला पारावरच उरला नाही. कोट्यावधी रुपये (Thirteen crore) जमा झालेली माहिती मिळताच ग्राहकही खूष झाले . परंतु, काही क्षणातच असं काही घडलं की, देशातील सर्वात मोठ्या एचडीएफसी बॅंकेच्या ग्राहकांच्या आनंदावर पाणी फेरलं. एचडीएफसीकडून झालेल्या एका मोठ्या चुकीमुळं (HDFC Bank Error) ग्राहकांच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. त्यामुळे संपूर्ण देशभरात एचडीएफसीचा हा विषय चर्चेचा मुद्दा बनला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नईच्या के टी नगरमधील एचडीएफसी बॅंकेच्या १०० ग्राहकांना एक एसएमएस आला होता. ग्राहकांच्या खात्यात १३ कोटी रुपये जमा झाले असल्याची माहिती या मेसेजमध्ये देण्यात आली होती. म्हणजे बॅंकेकडून तब्बल १३०० कोटी रुपयांचे मेसेज पाठवण्यात आले. १३ कोटी रुपयांचा मेसेज पाहिल्यावर एक ग्राहक खडबडून जागा झाला आणि त्यानं तातडीनं पोलिसांना संपर्क केला. एवढ्या मोठ्या रक्कमेचा मेसेज आल्यानंतर आपला अकाउंट हॅक तर नाही झाला ना ? अशी भीती त्या ग्रा्हकाला वाटत होती.

या संपूर्ण प्रकाराबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यावर त्यांनी बॅंकेच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला. बॅंकेच्या तांत्रिक अडचणीमुळं हा मेसेज गेला असल्याची माहिती एचडीएफसी बॅंकेकडून पोलिसांना देण्यात आली. बॅंकेच्या एका सॉफ्टवेयरचं काम सुरु होतं, त्यामुळे हा सर्व प्रकार घडला असल्याचं समोर आलं. चेन्नईच्या एचडीएफसी एकाच शाखेमध्ये काही ग्राहकांना मेसेज गेल्याचा प्रकार घडला.

एचडीएफसीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तांत्रिक अडचणीमुळे ग्राहकांना मेसेज गेले. कोणत्याही प्रकारची हॅकिंग झाली नाही तसंच ग्राहकांना तेरा कोटी रुपये जमा केलेले नाहीत. आम्हाला याबाबत समजल्यावर तातडीनं सर्व खात्यांचे पैसे काढण्याचे व्यवहार आम्ही बंद केले. रविवारीच या समस्येचं जवळपास ८० टक्के निराकरण झालं आहे, असा दावाही एचडीएफसीच्या एका अधिकाऱ्याने केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : अबब! राज्यात पैशांचा महापूर, आचारसंहितामध्ये आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त!

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT