Union Budget 2022 For Electric Vehicles Saam Tv
देश विदेश

Union Budget 2022 For Electric Vehicles: शहरामध्ये चार्जिंग स्टेशन नाही, तर बॅटरी स्वॅपिंग असणार!

देशात मोठ्या शहरांमध्ये इलेक्ट्रीक वाहनांच्या वापराकरिता बॅटरी स्वॅपिंग पॉलिसी आणली जाणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था: देशात मोठ्या शहरांमध्ये इलेक्ट्रीक वाहनांच्या वापराकरिता बॅटरी स्वॅपिंग पॉलिसी आणली जाणार आहे. त्यामुळे देशामध्ये इलेक्ट्रीक वाहने वापरण्याचे प्रमाण देखील वाढणार आहे, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावेळी केले आहे. (Union Budget 2022 For Electric Vehicles)

देशामध्ये सध्या इलेक्ट्रीक वाहनाकरिता मोठी मागणी आहे. परंतू, चार्जिंग स्टेशनची कमतरता असल्यामुळे याकडे लोक मोठ्या प्रमाणावर वळताना दिसून येत नाहीत. शहरांमध्ये जागा अपुरी असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर चार्जिंग स्टेशन उभारू शकत नाही. यामुळे शहरांकरिता बॅटरी स्वॅपिंग योजना आणली जाणार आहे.

हे देखील पहा-

छोटे आणि लघू उद्योग मजबूत करण्याकरिता सरकार प्रयत्न करणार आहे. या उद्योगाकरिता २ लाख कोटी रुपयांची मदत केली जाणार आहे. डिजिटल पेमेंटकरिता प्रोत्साहन दिले जाणार आहे. इझी ऑफ डुईंग बिझनेस २.० लाँच. पोस्टाला बँकेशी जोडले जाणार आहे. एलआयसीचा आयपीओ लवकरच येणार, असेही निर्मला सीतारामन यांनी यावेळी सांगितले आहे.

निर्मला सीतारामन पुढे म्हणाल्या की, पुढील ३ वर्षात भारतात ४०० हून अधिक वंदे भारत ट्रेन बनवण्यात येणार आहे. तसेच पंतप्रधान गती शक्ती १०० कार्गो टर्मिनल्स उभारले जाणार आहेत. अर्बन ट्रान्सपोर्टला रेल्वेशी देखील जोडले जाणार आहे. २०२३ पर्यंत रेल्वे नेटवर्क २०० किमी वाढवण्यात येणार आहे. वन स्टेशन वन प्रोडक्ट अंतर्गत लहान शेतकरी आणि लघु उद्योजकाकरिता नवीन उत्पादन आणि कार्यक्षम लॉजिस्टिक विकसित करणार आहे असे त्यांनी सांगितले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : संकष्टी चतुर्थीला बाप्पा ५ राशींच्या लोकांची इच्छा पूर्ण करणार; तुमच्या नशिबात काय लिहिलंय? वाचा

Nepal Crisis : माजी पंतप्रधानांच्या पत्नीचा होरपळून मृत्यू, आंदोलकांनी पेटवलं होतं घर

Nepali celebrities: मनीषा कोइरालापासून सुनील थापापर्यंत, या नेपाळी सेलिब्रिटींनी मनोरंजन विश्वातून जिंकली चाहत्यांची मनं

Fever: वारंवार ताप येणे 'हे' कोणत्या आजारांचे लक्षण आहे?

Pune Crime : विसर्जन मिरवणुकीत महिला पत्रकाराचा विनयभंग; पोलिसांकडून मोठी कारवाई, ढोल ताशा पथकातील दोघांना अटक

SCROLL FOR NEXT