धक्कादायक : लग्नाच्या मिरवणुकीत DJ वाजवायला नकार दिल्याने नवरदेवाची आत्महत्या SaamTV
देश विदेश

धक्कादायक : लग्नाच्या मिरवणुकीत DJ वाजवायला नकार दिल्याने नवरदेवाची आत्महत्या

स्वत:च्या लग्नाच्या (Marriage) मिरवणुकीच्या काही तास आधी एका नवरदेवाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजस्थान : स्वत:च्या लग्नाच्या (Marriage) मिरवणुकीच्या काही तास आधी एका नवरदेवाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत तरुणाच्या घरी नोत्राचा कार्यक्रम होता त्यामध्ये तो रात्रभर कुटुंबांतील व्यक्तींसोबत होता. दरम्यान सकाळच्या वेळेला तो घरातून बाहेर गेला ते पुन्हा परतलाच नाही. लग्नाच्या काहीतास आधीच नवरदेवच अचानक गायब झाल्याने घरच्यांची चांगलीच तारांबळ उडाली आणि नवरदेवाचा शोधाशोध सुरु झाली आणि याच वेळी नवरदेवचा मृतदेह एका झाडाला लटकलेला स्थितीत आढळून आल्याने संपुर्ण कुटुंबावरती दु:खाचा डोंगर कोसळला.

सदरची दु:खद घटना राजस्थानमधील (Rajasthan) बांसवाडा येथे घडली असून सदरची आत्महत्या करणाऱ्या युवकाने आत्महत्या केलेले कारण तर खूपच धक्कादायक आहे. लग्नात डीजे वाजवू दिला नाही म्हणून ही आत्महत्या केली असल्याच सांगितलं जात आहे. मात्र, पोलिसांनी काही गोष्टींची माहिती दिली नाही. हे संपूर्ण प्रकरण अंबापुरा पोलीस ठाण्याच्या असल्याचे सांगितले जात आहे.

हे देखील पहा -

मृत तरुणाचे नाव लाल सिंह (Lal Singh) असून त्याचे वय 21 वर्ष आहे. शुक्रवारी कुशलगढच्या सारेल गावामध्ये लालसिंगची मिरवणूक काढण्यात येणार होती. त्याच्या अधी लग्नात झालेला खर्च भागवण्यासाठी नोटरेचे आयोजन करण्यात आलेलं. आणि याच आयोजित नोटरेच्या कार्यक्रमात नवरदेव सोहळ्यात तरुण रात्रभर कुटुंबासोबत होता. मात्र सकाळी तो बाहेर गेला आणि त्यानंतर लालसिंहचा मृतदेहच झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली, त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला.

शवविच्छेदनानंतर पोलिसांनी (Police) मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. लाल सिंहचा विवाह सामाजिक रितीरिवाजानुसार होत होता. त्याच्या नाराजीबद्दलही कुटुंबीय माहिती देऊ शकत नाहीत. नोत्रा कार्यक्रमादरम्यान लाल सिंहने डोक्याला स्कार्फ बांधला होता. त्याच स्कार्फने त्याने आत्महत्या केली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का! बड्या नेत्यानं हाती धरलं एकनाथ शिंदेंचं 'धनुष्यबाण'

Crime News: संतापजनक! बेशुद्ध करत महिलेवर बलात्कार; उपचाराच्या बहाण्याने दिलं भूलचं इंजेक्शन,नंतर...

SCROLL FOR NEXT