PM Narendra Modi Saam Tv
देश विदेश

PM Modi Press Meet: भारतावर जगाचा विश्वास- पंतप्रधान नरेंद्र मोदी

अधिवेशनात देशाला प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी उत्तम चर्चा व्हावी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था: आजपासून संसदेचे (Parliament) अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session) सुरु झाले आहे. यातच विरोधकांनी मोदी सरकारला (Narendra Modi) घेरण्याची तयारी सुरु केली आहे. दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी अधिवेशनामध्ये सर्वांनी चर्चा करावी आणि देशाला प्रगतीच्या दिशेने नेण्याकरिता उत्तम चर्चा व्हावी असे आवाहन करण्यात आले आहे. (The world faith in India PM Modi)

हे देखील पहा-

अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. मी या अधिवेशनामध्ये सर्वांचे स्वागत करत आहे. आज वैश्विक स्तरावर भारताकरिता (India) खूप संधी आहे. देशाची आर्थिक प्रगती, लसीकरण (Vaccination) कार्यक्रम, मेड इन इंडिया वॅक्सिनविषयी जगात एक विश्वास तयार झाला आहे.

या अधिवेशनामध्ये यावर मुक्त चर्चा होणार आहे, जेणेकरुन जगभरामध्ये एक विश्वास तयार होणार आहे, अशी चर्चा व्हावी, असे यावेळी मोदी म्हणाले आहेत. पंतप्रधान मोदी म्हणाले की, सर्व राजकीय पक्षामधील सदस्य खुल्या मनाने उत्तम चर्चा करुन देशाला पुढे नेण्याकरिता नक्कीच मदत करणार आहेत. ही गोष्ट खरी आहे की वारंवार निवडणुकांमुळे (election) अधिवेशन प्रभावित होत असतात.

मात्र, मी सर्व सदस्यांना विनंती करतो की निवडणुका आपल्या जागी त्या चालत राहतील. मात्र आपण अधिवेशनात फलदायी चर्चा करणार आहोत. पंतप्रधान म्हणाले की, मुक्त आणि मानवी संवेदनांसह चर्चा करुन आगामी वर्षात नव्या आर्थिक उंचीवर नेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tharala Tar Mag! : "सगळे पुरावे खोटे..."; अर्जुननं कोर्टात बाजी पलटली, सायलीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी लढवली अनोखी शक्कल| VIDEO

Maharashtra News Live Update : वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पाचा जलसाठा पोहोचला 35 टक्क्यांवर

Highway tyre puncture: हायवेवर टायर पंक्चर झाल्यास काय कराल?

Oral Health Tips: रोज फक्त 2 मिनिटांचा हा उपाय ठरू शकतो दातांसाठी फायदेशीर; डॉक्टरांनी सांगितल्या तोंडाच्या आरोग्याच्या महत्त्वाच्या सवयी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹१५०० कधी येणार? ८ दिवसांत पैसे जमा होण्याची शक्यता, महत्त्वाची अपडेट समोर

SCROLL FOR NEXT