Khama Bindu
Khama Bindu Saam Tv
देश विदेश

नवरदेवाशिवाय लग्न पार पडलं, तिने स्वतःच्याच भांगेत सिंदूर भरलं... (पाहा Photos)

वृत्तसंस्था

गुजरातमधील वडोदरा येथे एक अनोखा विवाह पाहायला मिळाला आहे. या विवाह सोहळ्यात मंडप सजला होता, मिरवणूकही होती, पण वऱ्हाडीमंडळी आणि पंडित नव्हते. या लग्नाची बातमी ज्यांनी ऐकली त्यांना धक्काच बसला! 24 वर्षीय क्षमा बिंदूने काल (बुधवारी) स्वतःशी लग्न केले. बिंदूने 11 जून रोजी लग्न करणार असल्याचे सांगितले होते. मात्र तिने ठरवलेल्या वेळेपूर्वीच लग्न केले.

क्षमाने लवकर लग्नाबद्दल सांगितले की, कोणीतरी आपल्या घरी येऊन वाद निर्माण करेल या भीतीने त्यांनी नियोजित वेळेपूर्वीच लग्न केले. तिला तिचा खास दिवस खराब करायचा नव्हता. त्यामुळे बुधवारीच त्यांचे लग्न झाले. यावेळी तिचे खास मित्र उपस्थित होते.

या लग्नात मेहंदी आणि हळदीचे विधी पार पडले. क्षमाने अग्नीसमोर सात फेरे घेऊन संपूर्ण विधी पार पाडले. या लग्नात वर किंवा पंडित नव्हते, फक्त क्षमाचे खास मित्र उपस्थित होते. देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच विवाह असल्याचे सांगण्यात येत आहे.

लग्नात क्षमा बिंदूने लाल साडी नेसली होती, हातात मेंदी आणि मागणीत सिंदूर लावले होते. हा विवाह डिजिटल स्वरुपात संपन्न झाला. क्षमाने आधी मंदिरात लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र भाजप नेत्याच्या विरोधानंतर तिने घरीच लग्न करण्याचा निर्णय घेतला. यानंतर पंडित यांनी लग्नाचे विधी करण्यासही नकार दिला होता. यानंतर क्षमाने टेपवर मंत्र लावून लग्न करण्याचा निर्णय घेतला.

क्षमाने सांगितले की ,आता ती हनीमूनसाठी गोव्याला जाणार आहे. या लग्नामुळे तिचे आई-वडीलही खूप खूश आहेत. त्यांनी आशीर्वादही दिले आहेत. क्षमाच्या सोलो लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. या लग्नाबद्दल जाणून घेण्यासाठी लोक खूप उत्सुक आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धैर्यशील मोहिते पाटील यांनी विश्वासघात केला - फडणवीस!

Lok Sabha Election: गुजरातनंतर मध्यप्रदेशातही घडला 'सूरत कांड', इंदूरमध्ये काँग्रेसचा उमेदवार फितूर; उमेदवारी घेतली मागे

Raj Thackeray: उद्धव ठाकरेंच्या सभेला राज ठाकरेंच्या सभेने प्रत्युत्तर..

Today's Marathi News Live : पुण्यात राहुल गांधींची सभा, ३ मे ला Sspms ग्राउंडवर होणार सभा

Shantigiri Maharaj: नाशिकमध्ये शिंदे गटाकडून शांतीगिरी महाराजांना उमेदवारी?

SCROLL FOR NEXT