वृत्तसंस्था: इंदूर येथे एक मन हेलावणारी धक्कादायक घटना घडली आहे. कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्याचा (student) बसखाली चिरडून मृत्यू झाला आहे. मृतक विद्यार्थी हा बसमध्ये चढत होता. त्यावेळेस ही धक्कादायक घटना घडली आहे. मृतक विद्यार्थी बसमध्ये चढताना बस ड्रायव्हरने न बघता बस सुरु केली. यानंतर लगेच वेग वाढवल्यामुळे ही दुर्देवी घटना घडली आहे. संबंधित हृदयद्रावक घटना ही परिसरात सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.
पहा व्हिडिओ-
या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यावर तुमच्याही अंगावर शहारे उभे राहणार आहे. संबंधित घटना ही इंदूरच्या भंवरकुआ पोलीस (Police) ठाणे हद्दीतील आहे. मृतक विद्यार्थी आपल्या भावाबरोबर कॉलेजला (college) जाण्याकरिता घराबाहेर पडला होता. कॉलेजला जाण्याकरिता ते बसने प्रवास करणार होते. त्याकरिता ते नियमितच्या ठरलेल्या बस स्टॅण्डवर आले होते. यावेळी बस तिथे आली. मृतक विद्यार्थ्याचा भाऊ बसमध्ये चढला. यानंतर मृतक मुलगा हा बसमध्ये चढू लागला होता. पण यावेळी बस चालकाच्या निष्काळजीपणाने दुर्देवी घटना घडली आहे.
हे देखील पहा-
बसचालकाने बस चालू करताना मागेपुढे बघितले नाही. त्याने बसमध्ये प्रवासी चढत आहेत की नाही, याविषयी देखील शहानिशा केली नाही. बसचालकाने गाडी सुरु केली. यानंतर लगेच गाडीचा वेग वाढवला. यावेळी मृतक विद्यार्थी हा गाडीवर चढत होता. तो गाडीच्या दरवाज्यावर चढला, पण गाडीने वेग धरताच त्याचा गाडीखाली तोल गेला आहे. त्यानंतर त्याच्या अंगावरुन बसचे पाठीमागील चाक गेले आहे.
विद्यार्थ्याच्या अंगावरुन गाडी गेल्यामुळे तो रस्त्यावर बघ्याची भूमिका झाली होती. रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांनी त्याला रस्त्यावर पडताना बघितल्यावर त्यांनी तातडीने त्याच्याजवळ धाव घेतली. जखमी विद्यार्थ्याला तातडीने एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. पण तोपर्यंत उशिर झाला होता. त्या विद्यार्थ्याची प्राणज्योत मालवली होती.
या अपघाताची घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शी आणि मृतक विद्यार्थ्याच्या भावाच्या जबाबानुसार संबंधित बसच्या चालकावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांचा पुढील अधिक तपास सुरु आहे.
Edited By- Digambar Jadhav
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.