Viral Video Saam TV
देश विदेश

Viral Video:ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मधोमध अडकली विद्यार्थिनी; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल...

पोटाचा भाग ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्यामध्ये अडकल्याने तिला खूप त्रास होत होता.

साम टिव्ही ब्युरो

Viral Video: अती घाई संकटात नेई ही म्हण तुम्ही अनेक वेळा ऐकली असेल. प्रत्येक गोष्टीसाठी हवा तेवढा वेळ देणे आवश्यक असते. नाहीतर अती घाई आपल्या जीवावर देखील बेतू शकते. सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. यात एक मुलगी ट्रेन पकडण्यासाठी इतकी जोरात धावते की तिला स्वत:च्या गतीवर नियंत्रण ठेवता येत नाही. त्यामुळे ती थेट रेल्वे आणि रुळांच्यामध्ये फसते. सुदैवाने धावती ट्रेन नसल्याने या मुलीचा जीव वाचला आहे. (Latest Marathi News)

आंध्र प्रदेशच्या विशाखापटनमयेथील दुव्वाडा स्टेशनचा हा व्हिडिओ (Video) आहे. लांबचा प्रवास करत असताना प्रत्येकाला वेळेत आपले ठिकाण गाठायचे असते. यासाठी सर्वचजण घाई करतात. ही घाई शाळेत जाणाऱ्या या मुलिच्या जीवावर बेतताबेतता राहिली आहे. तिचा पाय घसरल्याने ती ट्रेनच्या खाली पडते. मात्र या वेळी ट्रेन थांबलेली असल्याने ती मध्येच अडकते. पोटाचा भाग ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्यामध्ये अडकल्याने तिला खुप त्रास होतो. यामुळे ती भरपूर रडते. तिला किती त्रास होत आहे हे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे.

तिला वाचवण्यासाठी दोन पोलीस ( Police) आणि आरपीएफचे जवान देखील तिथे दाखल होतात. विद्यार्थीनीला सोडवण्यासाठी सर्वजण शर्थीचे प्रयत्न करत असतात. अशात तास दोन तास प्रयत्न केल्यावर अखेर तीला बाहेर काढण्यात यश येते. इंस्टाग्रामवर @VizagWeather247 या अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: खडकवासल्यातून पाण्याचा विसर्ग; पुण्यातील टिळक पूल वाहतुकीसाठी बंद

Parliament: अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल, लोकसभेत नेमकं काय घडलं?

Online Gaming Ban Bill : ऑनलाइन गेम खेळणं बंद होणार? केंद्राचं विधेयक, ऑनलाईन गेम 'ओव्हर'

BEST Election: ठाकरे बंधूंच्या हाती भोपळा, BMC च्या लिटमस टेस्टमध्ये ठाकरे फेल

Brain Health: तल्लख बुद्धी हवी? तर मेंदूच्या आरोग्यासाठी आजच सोडा 'या' वाईट सवयी

SCROLL FOR NEXT