माकडाने ट्रेनरवरचं केला हल्ला अन....(पहा व्हिडीओ) Saam Tv
देश विदेश

माकडाने ट्रेनरवरचं केला हल्ला अन....(पहा व्हिडीओ)

माणसांच्या मनोरंजनाकरिता प्राण्यांना ट्रेन करण्यात येत हे आपल्याला माहिती तर असेल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : माणसांच्या मनोरंजनाकरिता प्राण्यांना ट्रेन Animals करण्यात येत हे आपल्याला माहिती तर असेलच, त्यांची ट्रेनिंग भरपूर कडक असते. जेणेकरून त्यांनी आपल्या मालकाच्या आदेशाचे पालन करावे लागते. मात्र, प्राण्यांना मनोरंजनाचे गुण शिकवणे तितकेही सोपे नसते. अनेक वेळा ट्रेनिंग दरम्यान प्राणी आपल्या ट्रेनरवरच हल्ला Animal Attack करत असतात.

हे देखील पहा-

सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल Viral Video होत असताना दिसून आला आहे. हा व्हिडिओ बघून तुम्हाला हसू आवरणार नाही. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये Viral Video तुम्ही बघू शकता की एका माकडाच्या हातात तलवार असून शेजारीच त्याचा ट्रेनर बसला आहे. हा ट्रेनर माकडाचा हात पकडून त्याला ३ ते ४ वेळा आपल्या डोक्यावर तलवार मारण्याचे ट्रेनिंग देत आहे.

परंतु, शेवटी जेव्हा तो माकडाचा हात सोडतो तेव्हा माकड त्याच्या डोक्यावर जोराने वार करतं. हे बघून लोकांना हसू येतं असणार आहे. हा विनोदी व्हिडिओ @RexChapman नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ शेअर करत असताना कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, की मी माझं हसू आवरू शकत नाही. बातमी देईपर्यंत हा व्हिडिओ ८ लाखहून अधिकांनी लोकांनी बघितला आहे. तर, २१ हजारहून अधिक लोकांनी लाईक आणि ३५०० जणांनी रिट्विट केला आहे.

अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट देखील मोठ्या प्रमाणात केले आहेत. या विनोदी व्हिडिओला लोकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. एका यूजरने या व्हिडिओवर कमेंट करत लिहिले आहे, बहुतेक या माकडाने एकदाच आपला सगळा राग काढला आहे. दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की, मस्करीत माकडाने खेळ केला असावा. याशिवायही अनेकांनी यावर मजेशीर कमेंटचा वर्षाव केले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : पंतप्रधान मोदी देणार 5 हजारांचं गिफ्ट? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय? VIDEO

Maharashtra Live News Update : उल्हासनगरमध्ये ऑफिस खुर्ची बनवणाऱ्या कारखान्याला मध्यरात्री भीषण आग

Diwali 2025 Shani Vakri: दिवाळीला बऱ्याच वर्षांनी होणार शनी वक्री; 'या' राशींना मिळणार शनीचा आशिर्वाद

Shaniwarwada Namaz Row: नमाजपठणवरुन महायुतीत जुंपली; मेधाताईंना अटक करण्याची ठोंबरेंची मागणी

Sanjay Shirsat : संजय शिरसाटांचा अजब पॅटर्न; घरी बोलावून शेतकऱ्याचं सोडवलं उपोषण

SCROLL FOR NEXT