छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना ही छोटी गोष्ट- मुख्यमंत्री बोम्मई Saam TV
देश विदेश

छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना ही छोटी गोष्ट- मुख्यमंत्री बोम्मई

मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने सीमाभागात संताप.

संभाजी थोरात

कर्नाटक : कर्नाटकमध्ये घडलेल्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री ्बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना ही छोटी गोष्ट आहे, अशा छोट्या गोष्टींसाठी दगडफेक करणं शांतता भंग करणे हे चुकीचं आहे. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याने सीमा भागात संताप निर्माण झाला आहे. काल रात्रीपासून बेळगावमध्ये तणावाची परिस्थीती आहे. अनेक ठिकाणी दगडफेक, जाळपोळ सुरु असतानाच मुख्यमंत्र्यांच हे विधान या वादाल आणखी चालना देण्याची शक्यता आहे.

दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याला काळं फासण्यात आल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे, याच घटनेचा निषेध करण्यासाठी आणि महाराजांच्या पुतळ्याची पुजा करण्यासाठी निघालेल्या शिवप्रेमींना अडवले आहे. कलम १४४ चं कारण देत पोलिसांनी त्यांना अडवले आले. ज्या शिवप्रेमींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, त्यापैकी माजी महापौर शिवाजी सुंठकर, माजी उपमहापौर प्रकाश शिरोळकर आणि इतर कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शिवप्रेमी महिलांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले आहे.

महाराष्ट्रातून या घटेनेचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. राज्यातील नेले संजय राऊत, सचिन सावंत, एकनाथ शिंदे, छगन भुजबळ यांनी घटनेची तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या घटनेवर भाजपचे नेते मात्र गप्प आहेत. राज्यातील सांगली, मिरज, कोल्हापूर, पुण्यामध्ये घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वर्ध्यात वीज पडून दोन ठार, एक गंभीर

Ajit Pawar: मागच्या आणि आताच्या अजित पवारांमध्ये खूप फरक; उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवला धक्का, ICC ने सूर्यावर केली मोठी कारवाई

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

SCROLL FOR NEXT