The Howrah Bridge is under attack from gutkha chewers  Twitter/ @AwanishSharan
देश विदेश

हावडा ब्रिजला गुटख्याच्या पिचकाऱ्यांचा धोका; ७० वर्षांच्या ऐतिहासिक पुलाला चढतोय गंज

Howrah Bridge is under Rust Attack: याबाबत २०१३ मध्ये कोलकाता पोर्ट ट्रस्टने (Kolkata Port Trust) एक अहवाल प्रसिद्ध केला होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कोलकाता: पश्चिम बंगालमधील ऐतिहासिक आणि जगप्रसिद्ध अशा हावडा ब्रिजचं अस्तित्वं धोक्यात येतंय. ते म्हणजे कुणा भूकंपामुळे नाही तर, माणसाच्याच किळसवाण्या कृत्यामुळे. गुटखा (gutkha) आणि तंबाखू (tobacco) खाणारे अनेक जण या लोखंडी पुलाला आधार देणाऱ्या मुख्य खांबांवर गुटख्याच्या पिचकाऱ्या मारतात. गुटखा आणि लाळ मोठ्या प्रमाणात या खांबांना चिकटून राहते. परिणामी या पूलाला (Howrah Bridge) आता गंज (Rust) लागायला सुरुवात झाली आहे. पूलाची देखभाल करणाऱ्या कोलकाता पोर्ट ट्रस्टने ही माहिती दिली आहे. एवढ्या मजबूत आणि सुंदर पूलाला 'गु'टखा खाणाऱ्यांनी विद्रूप तर बनवलेच आहे, पण असंच चालू राहिलं तर या पूलाचं अस्तित्व देखील धोक्यात येऊ शकतं. (The Howrah Bridge is under attack from gutkha chewers)

हे देखील पहा -

याबाबत २०१३ मध्ये कोलकाता पोर्ट ट्रस्टने (Kolkata Port Trust) एक अहवाल प्रसिद्ध केला होता. यात मुख्य अभियंता ए. के. मेहरा यांनी सांगितले होते की, अभ्यासात पुलाच्या दोन्ही बाजूंच्या हँगर बेसच्या कव्हरवर गुटख्याचे जाड थर आढळून आले आहेत. रासायनिक चाचण्या केल्यानंतर असे आढळून आले की, या कव्हर्सची जाडी खूप कमी झाल्याचे दिसून आले होते. गुटख्यातील रसायनांमुळे या पूलाला गंज लागल्याचे स्पष्ट होते, असे मेहरा यांनी सांगितले. पुलाच्या वरची रचना डेक स्लॅबवर प्रत्येक बाजूला 39 हँगर्सने धरलेली आहे. पादचारी मार्गावरील हँगरच्या तळांवर सर्वात वाईट गंज दिसून आला आहे. अधिकाऱ्यांच्या मते गुटखा चघळणाऱ्या पादचाऱ्यांद्वारे सतत थुंकल्यामुळे लाळ पूलाला चिकटते आणि गंज लागतो.

अंदाजे पाच लाख पादचारी दररोज या पुलाचा वापर करतात. हॅन्गर बेस 6 मिमी जाड सौम्य स्टील प्लेट्सने बनवलेले आहेत. जादवपूर विद्यापीठातील रासायनिक अभियांत्रिकीचे सहयोगी प्राध्यापक देबाशिष रॉय म्हणाले की, गुटख्यात चुना, काथू (खैर किंवा कठ्ठा), सुपारी आणि तंबाखू असतात यामुळे ते धातू खराब करू शकतात. कोलकाता पोर्ट ट्रस्टने 2007 मध्ये पुलाचे सर्व हँगर बेस कव्हर (हूड) बदलले होते. कारण तेव्हा स्टील प्लेट्स मोठ्या प्रमाणात क्षीण झाल्याचे आढळून आले होते. मात्र तरीही थुंकण्याचे प्रमाण कमी होताना दिसत नाही.

हावडा ब्रिज - Howrah Bridge | Saam Tv News

हावडा ब्रिज म्हणजेच रवींद्र सेतू (Ravindra Setu) हा पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्याला हावडा शहराशी जोडणारा पूल आहे. सस्पेन्शन प्रकारातील हा पूल गंगा नदीच्या हुगळी या शाखेवर बांधला आहे. १९३६ मध्ये या पूलाचे बांधकाम सुरू झाले आणि ते काम १९४२ ला पूर्ण झाले. ३ फेब्रुवारी १९४३ पासून हा पूल वाहतूकीसाठी खुला झाला. १४ जून १९६५ मध्ये गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या नावावरून या पुलाचे नामकरण रवींद्र सेतू असे करण्यात आले. सध्या कोलकाता पोर्ट ट्रस्टतर्फे या पुलाची देखदेख केली जाते.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: स्मशानभूमीतून घरी परतल्यानंतर आपण आंघोळ का करतो?

Maharashtra Live News Update: रत्नागिरी - आंबा घाटात दरड कोसळली

Parali News : पुराच्या पाण्यात कार गेली वाहून; तिघांना वाचविण्यात यश, एकाचा शोध सुरू

Mumbai School Bus : माणुसकी! मुंबईला पावसाचा तडाखा, स्कूल बस अडकली पाण्यात, धो धो पावसात पोलिसांनी मुलांना वाचवले

Tapola Tourism : महाबळेश्वरपासून हाकेच्या अंतरावर वसलय हिडन हिल स्टेशन पाहा काश्मिरसारखे सौंदर्य क्षणात

SCROLL FOR NEXT