वृत्तसंस्था: 'देव तारी त्याला कोण मारी' ही म्हण तुम्ही ऐकली असेलच ना, जी एका व्यक्तीवर अगदी अचूक असल्याचे सिद्ध झाले आहे. राजस्थान (Rajasthan) मधील सवाई माधोपूर (Madhopur) येथे मालगाडी तरुणांच्या अंगावरुन गेली आणि परंतु, तरुणांना थोडं देखील खरचटलं सुद्धा नाही. गंगापूर (Gangapur) शहरातील करौली ते हिंडौन गेट दरम्यान दिल्ली (Delhi)- मुंबई (Mumbai) मेन लाइनवर एका तरुणाचा ट्रेनने धडक दिल्याची धक्कादायक बातमी मिळाली आहे. (the goods train passed over the man lying on the railway track did not even get scratched)
पहा व्हिडिओ-
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral) झाल्यावर लोक ते बघून थक्क झाले आहेत. व्हिडिओमध्ये (video) एक तरुण रेल्वे (Railways) ट्रॅकच्या मधोमध बेशुद्ध पडलेला असून संपूर्ण मालगाडी त्याच्या अंगावरून जाताना दिसत आहे. रेल्वे रुळावर पडलेल्या तरुणाच्या अंगावरून मालवाहतूक ट्रेन गेली आहे. दलचंद महावर असे रेल्वे रुळावर पडलेल्या तरुणाचे नाव असून, त्याचे वय 27 वर्षे आहे.
हे देखील पहा-
संपूर्ण मालगाडी त्याच्या अंगावरून गेली आहे. मात्र त्याला एक ओरखडाही लागला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण गंगापूर शहरातील नसिया कॉलनी येथील रहिवासी असून त्याला दारूचे व्यसन होते. हा तरुण दारूच्या नशेत रेल्वे रुळ ओलांडत होता. त्यादरम्यानच दारूच्या नशेत तो रेल्वे रुळाच्या २ रुळांमध्ये अडकला होता. डोक्याला मार लागल्याने तो बेशुद्ध पडला आणि ट्रॅकवरच पडून राहिला होता.
दरम्यान, एक मालगाडी दिल्लीहून मुंबईकडे जात होती. हा तरुण रेल्वे रुळाच्या मधोमध पडला होता आणि संपूर्ण मालगाडी त्याच्या अंगावरून गेली आहे. रेल्वे रुळाच्या २ रुळांमध्ये अडकलेला माणूस हा व्हिडिओ राजीव चोप्राने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. घटनास्थळी मोठा जमाव जमला आणि ट्रेन जात असताना तिथे उपस्थित लोक तरुणांना रुळावर झोपण्याचा सल्ला देताना दिसले आहे. मालगाडी पुढे गेल्यावर स्थानिक लोकांनी तरुणाला उचलून दुचाकीवरून गंगापूर शहरामधील शासकीय रुग्णालयात नेले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.