स्नेहील झणके, साम टिव्ही
जगात अस्वस्थता आहे, प्रत्येकजण भितीच्या छायेत वावरतोय. होय.. होय.. आज जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभं आहे पुढच्या ७२ तासांत म्हणजेच ३ दिवसात या तिसऱ्या महायुद्धाला सुरुवात होऊ शकते. अणूबॉम्बची निर्मिती करत असल्याचं म्हणत इस्रायलनं थेट इराणवर क्षेपणास्त्र डागून हल्ला केला या हल्ल्यानंतर इराण प्रंचड संतापलाय. इराण आता ड्रॅगनसारखी आग ओकणारेय. कारण इराणनं ऐतिहासिक मशिदीवरुन 'ऐलान ए जंग' म्हणत लाल निशाण फडकवलाय. या लाल निशाणाचं नेमकं काय महत्व आहे पाहूयात...
युद्धाचं निशाण फडकलं
जामकरन मशिदीवर फडकलं लाल निशाण
ईराणच्या कोम शहरातली मशिद
शिया मुसलमानांचं पवित्र धार्मिक ठिकाण
मशिदीवर लाल निशाण म्हणजे अन्यायाचा बदला घेण्याचा निश्चय
करबला युद्धात फडकला होता लाल झेंडा
शिया मुस्लिमांसाठी करबला युद्ध हे हुसैन यांच्या बलिदानाचे प्रतीक आहे, जे अन्यायाविरुद्ध लढण्याचे आणि धार्मिक मूल्यांचे रक्षण करण्याचे उदाहरण मानले जाते. आणि तेव्हा पासून बदला पुर्ण करण्याचा निश्चय केला की अशा पद्धतीनं लाल निशाण फडकवण्यात येते. त्यामुळे इराणनं आता लाल निशाण फडकवून आता माघार नाही म्हणत इस्त्रायलच्या दिशेनं ड्रोन आणि क्षेपणास्त्र डागून युद्ध सुरु झाल्याचं जाहिर केलंय. या युद्धानं जग आता दोन गटांत विभागलं गेलंय. कोणता देश कोणाच्या बाजून उभा राहिल पाहुयात.
इस्रायलच्या बाजूने येऊ शकणारे देश
अमेरिका
ब्रिटन
फ्रान्स
जर्मनी
स्वीडन
चेक प्रजासत्ताक
ऑस्ट्रेलिया
न्यूझीलंड
ईराणच्या बाजूने येऊ शकणारे देश
रशिया
चीन
इजिप्त
तुर्की
पाकिस्तान
इंडोनेशिया
इराक
ओमान
लेबनॉन
जॉर्डन
यातील जॉर्डन, सौदी अरेबिया, युएई, तुर्की सध्या तरी तटस्थ आहेत. तिसरं महायुद्ध देशाला कदापि परवडणारं नाही. आधीच भडकलेले इंधनाचे दर आणि वधारलेले सोन्याचे भाव पाहता देश या संभाव्य युद्धानं पुन्हा अनेक वर्षे मागे जाईल यात शंका नाही कारण जर या युद्धात अणवस्त्रांचा वापर झाला तर विनाश अटळ आहे त्यामुळे जगाची शांतता कायम ठेवायची असेल तर या दोन्ही देशांना शांततेवर श्रद्धा ठेवत सबुरीनं घ्यावं लागेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.