महिला शिक्षिकेने मुलाच्या अल्पवयीन मित्रासोबत ठेवले शंभरदा शारीरिक संबंध; अन्... Saam TV
देश विदेश

महिला शिक्षिकेने मुलाच्या अल्पवयीन मित्रासोबत ठेवले शंभरदा शारीरिक संबंध; अन्...

मुलासोबत लैंगिक संबंध ठेवण्याची घटना त्यांच्या घरी, त्यांच्या कारमध्ये आणि समुद्रकिनाऱ्यावर घडल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले.

वृत्तसंस्था

अमेरिकेत एका महिला शिक्षिकेला 6 वर्षांपेक्षा जास्त काळ तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. महिला शिक्षिकेने आपल्या मुलाच्या अल्पवयीन मित्राला फूस लावून त्याच्याशी शेकडोवेळा संबंध ठेवले. तिला 2020 मध्ये फ्लोरिडामध्ये अटक करण्यात आली होती. एका रिपोर्टनुसार, महिला शिक्षिकेचे एका हायस्कूलच्या विद्यार्थ्यासोबत जवळपास एक वर्षापासून संबंध होते.

मात्र, विद्यार्थ्याच्या वयाबाबत अनेकवेळा प्रश्न निर्माण झाला. सुरुवातीला, मुलाचे वय 15 वर्षे असल्याचे सांगण्यात आले, परंतु न्यायालयाने त्याचे वय 12 वर्षांपेक्षा जास्त आणि 16 वर्षांपेक्षा कमी असल्याचे सांगितले. आरोपी शिक्षिकेची लैंगिक गुन्हेगार म्हणून नोंद करण्यात येणार असल्याचे न्यायालयाच्या कागदपत्रांमध्ये म्हटले आहे. महिला शिक्षिकेने तिच्या मुलाच्या अल्पवयीन मित्रासोबत वर्षभरात शेकडो वेळा लैंगिक संबंध ठेवले. ही महिला जवळपास दररोज त्याचे शोषण करत असे. मुलासोबत लैंगिक संबंध ठेवण्याची घटना त्यांच्या घरी, त्यांच्या कारमध्ये आणि समुद्रकिनाऱ्यावर घडल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले.

एस्कॅम्बिया काउंटी स्कूलचे जिल्हा अधीक्षक माल्कम थॉमस यांनी सांगितले की, आरोपी महिला शिक्षिकेने जेई हॉल सेंटरमधील शिक्षण संसाधन विशेषज्ञ म्हणून तिच्या पदाचा राजीनामा दिला आहे. रिपोर्टनुसार, महिला शिक्षिकेच्या मुलाच्या मित्राने अधिकाऱ्यांसमोर कबूल केले की तो एका वर्षाहून अधिक काळ महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवत होता. किशोरने एस्कॅम्बिया काउंटी शेरीफ ऑफिसच्या तपासकर्त्यांना सांगितले की त्यांच्यातील लैंगिक संबंध तो 15 वर्षांचा होता आणि महिला शिक्षिका 39 वर्षांची होती तेव्हापासून सुरू झाले होते.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Maharashtra Politics : फडणवीस-शिंदे असते तर गुंगा गुड्डा म्हटले असते, राऊतांच्या वक्तव्याने वाद उफळणार?

Morning Exercise: सकाळी उठताच फक्त ५ मिनिटे करा 'हे' व्यायाम; दिवसभर राहाल उत्साही आणि फ्रेश

Eknath Shinde : सिद्धिविनायक मंदिर देणगी घोटाळा प्रकरणात एकनाथ शिंदेंचे तातडीचे आदेश, ठाकरे सेना अडचणीत येणार?

Rohit Sharma: रोहित शर्मा स्वतःहून निवृत्ती घेणार नाही; मोहम्मद कैफच्या वक्तव्याने रंगली नवी चर्चा

SCROLL FOR NEXT