Python  Saam Tv
देश विदेश

ट्रायल रुमध्ये शिरला अजगर; रेस्क्यु टीमवरच केला हल्ला अन् मग होत्याचं नव्हतं...पहा Video

कपडे खरेदी करण्याकरिता आपण जेव्हा एखाद्या दुकानामध्ये जात असतो, तेव्हा कपडे घेण्याअगोदर ते ट्राय करून बघत असतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था: कपडे खरेदी करण्याकरिता आपण जेव्हा एखाद्या दुकानामध्ये जात असतो, तेव्हा कपडे घेण्याअगोदर ते ट्राय करून बघत असतो. हे कपडे आपल्याला व्यवस्थित बसल्यावर आणि आपल्यावर चांगले दिसल्यावर आपण ते खरेदी करत असतो. मात्र, एका स्टोरमध्ये एक अजगर ट्रायल रूमचे छत तोडून आतमध्ये शिरल्यावर मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला आहे. हा अजगर तिथे कसा पोहोचला, हे माहिती नाही. मात्र, तो ट्रायल रूममधून बाहेर पडायला तयार नव्हता. (The dragon entered the trial room Video Viral)

पहा व्हिडिओ-

रेस्क्यूकरिता आलेल्या टीमवर देखील त्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. या अजगराला जेव्हा जबरदस्ती बाहेर काढण्याचा प्रयत्न केला गेला होता. तेव्हा तो खूपच भडकला होता. अगोदर तर ज्या बिळामध्ये तो जाऊन बसला होता. तेथे त्याला बाहेर काढणे खूप अवघड झाले होते. नंतर अजगर रेस्क्यूकरिता आलेल्या व्यक्तीवरच हल्ला करू लागला. (Python in Roof of Changing Room) कपड्यांच्या मधून जात तो छताच्या आत कधी शिरला आहे. हे समजले देखील नाही.

हे देखील पहा-

यानंतर वनविभागाला याविषयी माहिती देण्यात आली आहे. काही वेळातमध्येच रेस्क्यू टीम तिथे पोहोचली होती. यावेळी हा अजगर छताच्या फॉल सिलिंगमध्ये बसलेला होता. हे तोडताच अजगर डोळ्यांसमोर दिसू लागला आहे. तो इतका भडकलेला दिसत होता की, जणू समोर कोणी येत असताना एखाद्याला कच्चं खाईल. फॉल सिलिंगमधून खाली लटकलेला हा अजगर अतिशय भयानक रूपात दिसत होता. तो वारंवार आपले तोंड उघडून रेस्क्यू टीमच्या सदस्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता.

रेस्क्यू टीमने त्याला खाली पाडण्याकरिता भरपूर प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र खाली पडताच अजगर अजूनच आक्रमक झाला होता. बराच वेळ अथक प्रयत्न केल्यावर अजगराला पकडण्यात रेस्क्यू टीमला यश आले आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर लोकांनी रेस्क्यूच्या या पद्धतीबाबत सवाल उपस्थित केले आहेत. स्नेक हुक न वापरल्यामुळे अनेकांनी हा व्यक्ती हिरोपंती दाखवत असल्याचे सांगितले गेले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Police Income Tax Investigation: इन्कम टॅक्स विभागानं वाढवलं टेन्शन, थेट 1050 पोलिसांना नोटीस, पोलिस दलात मोठी खळबळ

Maharashtra Live News Update : मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या सुरक्षेत वाढ

Marwadi Garlic Chutney: वरण भातासोबत काहीतरी झणझणीत खावसं वाटतयं? मग मारवाड स्टाईल लसूण चटणी ठरेल बेस्ट

धक्का लागल्याने सटकली; रागाच्या भरात हॉटेलबाहेर धारदार शस्त्राने तरुणाची हत्या, डोंबिवलीत खळबळ

फलटण डॉक्टर मृत्यू प्रकरणी काँग्रेस आक्रमक; उद्या वर्षा बंगल्याला घेरावाचा इशारा|VIDEO

SCROLL FOR NEXT