MP Sambhaji Raje:“मराठा समाजाला दिलेली आश्वासनं अपूर्ण”; खासदार संभाजीराजेंचा ठाकरे सरकारला उपोषणाचा इशारा

खासदार संभाजीराजे छत्रपती मराठा आरक्षण आणि त्याच बरोबर इतर विषयावर परत एकदा आक्रमक झालेले दिसून येत आहेत.
Chatrapati Sambhaji Raje
Chatrapati Sambhaji RajeSaam Tv
Published On

मुंबई: खासदार संभाजीराजे छत्रपती मराठा आरक्षण (Maratha reservation) आणि त्याच बरोबर इतर विषयावर परत एकदा आक्रमक झालेले दिसून येत आहेत. आता संभाजीराजे यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच ८ महिने उलटून देखील मागण्या मान्य न झाल्याने २६ फेब्रुवारीपासून मुंबईमध्ये (Mumbai) आझाद मैदानावर आमरण उपोषणाचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. संभाजी छत्रपती म्हणाले की, ५ मे २०२१ दिवशी मराठा आरक्षण रद्द झाल्यावर मराठा समाजाचे शैक्षणिक आणि सामाजिक नुकसान टाळण्याकरिता राज्य शासनाकडे समाजाच्या वतीने आम्ही काही मागण्या केले होते. १७ जून २०२१ दिवशी आपल्या उपस्थितीमध्ये मुंबई येथे झालेल्या बैठकीत आपण या सर्व मागण्या मान्य केले होते. (MP Sambhaji Raje warns Thackeray government go on hunger strike)

हे देखील पहा-

मात्र, आज ८ महिने उलटले तरी देखील या मागण्यांच्या अंमलबजावणी विषयी कोणती देखील प्रशासकीय कार्यवाही झाली असलेली दिसून आली नाही. मागण्या मान्य न झाल्याने मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याकरिता या मागण्यांची ठोस अंमलबजावणी होईपर्यंत २६ फेब्रुवारीपासून आझाद मैदान, मुंबई येथे मी स्वतः आमरण उपोषणास बसणार आहे, असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी यावेळी दिला आहे. २००७ पासून मी संपुर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे. मराठा समाज देखील वंचित घटक आहे. त्याकरीता आरक्षणाची भूमिका घेतली जाणार आहे.

मी मराठा आहे, म्हणून मराठा आरक्षणाकरिता लढतो आहे असे काही नाही. ५ मे २०२१ ला आरक्षण रद्द करण्यात आले होते. गेल्या काही दिवसामध्ये अनेकवेळा आंदोलने करण्यात आली होती. परंतू, अजून देखील कोणतीच मागणी पूर्ण झाली नाही. मी आत्तापर्यंत आक्रमक होतो. परंतू आता मी उद्विग्न झालो असल्याचे वक्तव्य खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी यावेळी केले आहे. मराठा आरक्षणाकरिता २६ फेब्रुवारीला मी स्वतः आमरण उपोषणाला मुंबईमध्ये आझाद मैदानात बसणार असल्याचे संभाजीराजे यांनी यावेळी सांगितले आहे. मला समन्वयक यांनी सांगितले आहे की, टोकाची भूमिका घेऊ नका.

Chatrapati Sambhaji Raje
Beed: धक्कादायक! प्रसूतीनंतर मातेचा मृत्यू; डॉक्टरांकडून हलगर्जीपणा झाल्याचा नातेवाईकांचा आरोप

परंतू, सरकार काहीच हालचाल करत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे माझी भूमिका आहे की आता २६ फेब्रुवारीला मी स्वतः आमरण उपोषणाला मुंबईतील आझाद मैदानात बसणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मी सर्वांना घेऊन जाणारा माणूस आहे. मी शाहू महाराजांचा वारस आहे. मला सगळ्यांना एवढच सांगायचं आहे की, आम्हाला टिकणारे आरक्षण द्या. मी सगळ्या पक्षाच्या नेत्यांना हात जोडून विनंती केली की आरक्षण द्या. आरक्षण कशाने गेले आहे हे देखील सांगितले आहे. परंतू, काहीच हालचाल होत असताना दिसून येत नाही. मी आरक्षण रद्द झाल्यावर रिव्ह्यू पिटिशन दाखल करा असे सांगितले होत. परंतू, खुप दिवसांनंतर याचीका दाखल करण्यात आली आहे. सध्या त्याची काय परिस्थिती आहे, हे काहीच माहिती नाही.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com